Monday, July 1, 2024

टेलिव्हिजन विश्वातील ‘या’ अभिनेत्रींनी निवडला दुसऱ्या क्षेत्रात कार्यरत असणारा जोडीदार

आपल्याकडे अशी म्हण आहे की, ‘जोड्या नेहमीच स्वर्गात बनतात.’ आणि या गोष्टीचा प्रत्यय प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यात येतो. लग्न जुळवून केलेले असो किंवा प्रेमात पडून केलेले असो या कोणत्याही पद्धतीच्या लग्नात जोड्या इतक्या सहजपणे बनतात की आपल्यालाच समजत नाही. मनोरंजनविश्वात पहिले तर अनेक जोड्या ह्या या क्षेत्रातील लोकांसोबतच जोडलेल्या आपण पहिल्या आहेत. सोबत काम करत असताना प्रेमात पडणे आणि लग्न करणे खूपच सामान्य आहेत. मात्र याच क्षेत्रात असे देखील कलाकार आहेत, ज्यांना त्यांच्या जोडीदार त्यांच्या कामाच्या क्षेत्रात नाही तर दुसऱ्याच क्षेत्रात मिळाला आहे. ज्या लोकांचा मनोरंजनविश्वाशी कोणताही संबंध नसला तरीही त्यांच्या जोडीदारामुळे ते या क्षेत्राशी जुळले जातात. अशी उदाहरणं बॉलिवूडमध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळतील पण टेलिव्हिजन विश्वातही अशी बरीच उदाहरणं आहेत. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही जोड्यांबाबत, ज्यांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार वेगळ्या क्षेत्रातील मिळाला आहे.

दिशा वाकाणी :
तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेतील लोकप्रिय पात्र असणाऱ्या ‘दया बेन’ अर्थात दिशा वाकाणीने देखील तिच्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मयूर पारीखसोबत लग्न केले आहे. मयूर हे मुंअबीमध्येच राहत असून ते पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहे. या दोघांनी २०१५ साली संपूर्ण विधिवत लग्न केले. त्यानंतर २०१७ साली त्यांना एक मुलगी झाली. प्रेग्नेंट असताना दिशाने काही काळ काम केले नंतर ती मॅटर्निटी लिव्हवर गेली त्यानंतर ती शोमध्ये दिसलीच नाहीये. आज चार वर्ष झाले दया बेन हे पात्र मालिकेत दिसत नाहीये. मात्र ती लवकरच परत येणार असल्याचे सांगितले जात आहे.

श्रद्धा आर्या :
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध चेहरा म्हणून श्रद्धा ओळखली जाते. ‘कुंडली भाग्य’ या लोकप्रिय मालिकेतून सर्वांच्या भेटीला येणाऱ्या श्रद्धा आर्याने देखील काही दिवसांपूर्वीच लग्न केले. श्रद्धाला देखील तिचा जीवनसाथी मनोरंजनविश्वाच्या बाहेर मिळाला. श्रद्धाने नेव्ही ऑफिसर असणाऱ्या राहुल नगलसोबत लग्न केले. त्याचे हे लग्न श्रद्धाच्या सांगण्यानुसार लव्ह कम अरेंज मॅरेज आहे.

अंकिता लोखंडे :
टेलिव्हिजन आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त प्रकाशझोतात असणारी अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडे ओळखली जाते. अगदी छोट्यात छोट्या कारणामुळे देखील ती चर्चेत येते. लवकरच अंकिता तिच्या लॉँगटाईम बॉयफ्रेंड असलेल्या विकी जैनसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. विकीचा या गलमेर इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नाही. तो एक बिजनेसमॅन असून तो वेगळ्या क्षेत्रात काम करतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुकेश अंबानींच्या घरात दगडांसाठीही आहे एसी? अभिनेत्री श्रेया धन्वंतरीने रंजक किस्सा केला शेअर

-असं कुणासोबतही होऊ नये! ‘एड्स’मुळे जीव गमावणारे प्रसिद्ध कलाकार, एका भारतीय अभिनेत्रीचाही समावेश

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम मूस जट्टानाने व्हर्जिनिटीवर सोडले आपले मौन, दिला महिलांचा आदर करण्याचा सल्ला

हे देखील वाचा