×

‘नकाब’मध्ये बरीच बोल्ड पाहायला मिळाली ईशा गुप्ता; अभिनेत्यासोबत बेड सीन, तर अभिनेत्रीसोबत लिपलॉकने रंगवल्या चर्चा

बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींमध्ये ईशा गुप्ताची (Esha Gupta) गणना केली जाते. ती दरदिवशी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनत असते. अभिनेत्री अनेकदा तिच्या बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. तिच्या हॉटनेसचे लाखो चाहते आहेत. अभिनेत्री दररोज तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते.

चित्रपटांव्यतिरिक्त ईशा गुप्ता वेब सीरिजमध्येही दिसली आहे. बोल्डनेसच्या बाबतीत सर्वाधिक चर्चेत असलेली वेब सीरिज म्हणजे ‘नकाब’ होय. या वेब सीरिजमध्ये ईशा गुप्ताने आणखी एका बोल्ड बॉलिवूड अभिनेत्रीसोबत स्क्रीन शेअर केलेली पाहायला मिळाली. ईशासोबत या वेबसीरिजमध्ये मल्लिका शेरावतनेही (Mallika Sherawat) महत्त्वाची भूमिका साकारलीय. (esha gupta crosses limit in nakaab web series given hot intimate liplock scene with mallika sherawat)

महत्त्वाचे म्हणजे, या वेबसीरिजमध्ये ईशा आणि मल्लिकाने लिपलॉक सीन दिला होता. दोन बोल्ड अभिनेत्रींच्या या बोल्ड सीनची खूप चर्चा झाली होती. या इंटिमेट सीनबाबत मल्लिका शेरावतने एका मुलाखतीत आपले मतही मांडले होते. तिने सांगितले की, पुरुषापेक्षा स्त्रीसोबत इंटीमेट होणे सोपे असते. एका महिलेशी जवळीक साधण्यात तिला कोणतीही अडचण नसल्याचे तिने त्यावेळी सांगितले होते.

‘नकाब’ ही वेब सिरीज २०२१ मध्ये रिलीझ झाली होती. मल्लिकाशिवाय ईशा गुप्ताने अभिनेता गौतम रोडेसोबतही बेड सीन दिला होता.

ईशा गुप्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘आश्रम ३’ या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलसोबत दिसणार आहे. यामध्ये ईशा बॉबी देओलच्या पब्लिसिस्टची भूमिका साकारणार आहे. ‘आश्रम’ वेब सीरिजचे दोन्ही भाग हिट ठरले, त्यानंतर प्रेक्षक आता याच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

त्याचवेळी मलायकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची २०१९ मध्ये ‘बू सबकी फटेगी’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. फरहाद सामजी दिग्दर्शित हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट होता. रिपोर्ट्सनुसार, मल्लिका लवकरच साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. ती ‘नागमति’ या पिरियड-ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

Latest Post