Thursday, July 18, 2024

फोटोत दिसणारी निरागस मुलगी आहे सुपरस्टारची आई अन् दिग्गज हिरोची पत्नी, ओळखलं का?

बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोमध्ये दिसणारी मुलगी एकेकाळी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होती. इतकच नव्हे, तर त्यांचे पतीही चित्रपटसृष्टीतील दिग्गज स्टार होते. काेण आहे ही अभिनेत्री? चला तर जाणून घेऊया…

फोटोमध्ये दिसणारी निरागस मुलगी दुसरी कोणी नसून नर्गिस दत्त (Nargis Dutt) आहे. नर्गिसचा जन्म 1 जून, 1929 राेजी कोलकातामध्ये झाला होता. तिचे खरे नाव फातिमा रशीद हाेते. नर्गिसने वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी ‘तलाश-ए-इश्क’ या चित्रपटात काम केले होते. तसेच, 1942मध्ये ‘तमन्ना’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यादरम्यान नर्गिसने ‘चाेरी चाेरी’, ‘काला बाजार’, ‘आह’, ‘पापी’, ‘धून’ यांसारखे दमदार चित्रपट सिनेसृष्टीला दिले.

नर्गिस तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते. नर्गिसने ‘मदर इंडिया’ या चित्रपटात आपल्या दमदार भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. 1957 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट भारतातील सर्वात जास्त चालणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट लोकांना इतका आवडला की, या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ऑस्कर पुस्कारासाठी नामांकनही मिळाले होते.

नर्गिस दत्त हिचे पती सुनील दत्त सिनेसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेता हाेते, तर तिचा मुलगा संजय दत्त सुपरस्टार आहे. संजयचा पहिला चित्रपट ‘रॉकी’ 8 मे रोजी रिलीज होणार होता, पण नर्गिसचे कर्करोगामुळे 3 मे रोजी निधन झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रेग्नसीबाबत अंकिता लोखंडे म्हणाली; ‘मी अजून बाळ आहे’, उषा नाडकर्णीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
‘तू आई कधी होणार?’, चाहतीच्या प्रश्नावर संतापली हेमांगी कवी; म्हणाली, ‘हे असले प्रश्न…’
डुप्लिकेट ऐश्वर्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, व्हिडिओ पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

हे देखील वाचा