Thursday, June 13, 2024

“हा” सुपरस्टार अभिनेता लवकरच होणार बाबा? स्वतः अभिनेत्याने दिलेल्या ‘त्या’ हिंटवरून चर्चांना उधाण

दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध, लोकप्रिय अभिनेता म्हणजे राणा डग्गुबत्ती. आपल्या कमालीच्या अभिनयासोबतच फिटनेससाठी, आकर्षक व्यक्तिमत्वासाठी तो ओळखला जातो. बाहुबली या सिनेमानंतर तर त्याच्या लोकप्रियतेत अधिकच भर पडली आहे. मात्र सध्या राणा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक बातमी येत आहे. लवकरच राणा बाबा होणार असल्याचे समजत आहे. राणाची पत्नी मिहिका बीचवर कफ्तान टॉप घालून फिरत असतानाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि मिहिका राणा आईबाबा होणार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या.

या बातम्यांवर किंवा अफवांवर नुकतेची राणाने प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीमध्ये राणाने त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केले. यावेळीच त्याला एकाने प्रश्न विचारला की, आता तर तो फॅमिली मॅन झाला आहे. यावर तो केवळ हसला आणि त्याने उत्तर देणे टाळले. त्यामुळे आता त्याचे फॅन्स आणि मीडियामध्ये मिहिका प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या कन्फर्म झाल्याचे समजले जात आहे.

या मुलाखतीमध्ये राणाने सांगितले की, “मला सुरुवातीपासून अभिनेता नाही तर निर्माता व्हायचे होते. यासाठी मी एक सिनेमा देखील बनवला होता. मात्र प्रत्येकानेच तो सिनेमा विकत घेण्यास नकार दिला. मात्र आता तो सिनेमा आंतरराष्ट्रीय टॉवर प्रदर्शित झाला असून, त्याने दोन पुरस्कार देखील जिंकले. पुढे मी अभिनयात आलो आणि विविध भूमिकांमधून अभिनय शिकण्याचा प्रयत्न करत आहे.”

दरम्यान राणा आणि मिहिका यांनी ऑगस्ट २०२० मध्ये लॉकडाऊनमध्ये लग्न केले. राणाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असून, तो हिंदी सिनेसृष्टीमधे देखील सक्रिय आहे. त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. बाहुबली सिनेमातील नकारात्मक भूमिकेमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘या’ चिमुकल्याच्या पत्नीसाेबत ऋतिकने केला ऑनस्क्रिन राेमान्स, ओळखा पाहू काेण?
पंजाबी गाण्यावर विकी काैशलने लावले ठुमके, व्हिडिओ एकदा पाहाच

हे देखील वाचा