बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे प्रसिद्धीच्या झोतात असते. स्वस्तिका जरी बंगाली अभिनेत्री असली तरी तिची फॅन फॉलोविंग संपूर्ण देशात आहे. मात्र मधल्या काही काळापासून सतत विविध कारणांमुळे चर्चेत आहे. मात्र आता तिने जो खुलासा केला आहे, त्यामुळे बंगाली इंडस्ट्रीमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. एका निर्मात्यावर तिने अनेक आरोप लावले आहे.
स्वस्तिका मुखर्जीने सहनिर्माते असणाऱ्या संदीप सरकार यांच्यावर अनेक आरोप लावले आहेत. स्वस्तिकाने संदीप आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवर अनेक आरोप लावले आहे. संदीप आणि त्यांच्या साथीदारांवर अभिनेत्रीने धमकीचे मेल पाठवल्याचे सांगितले आणि सोबतच धमकी दिली गेली की, तिच्या फोटोंसोबत छेडछाड करत त्यांना अश्लील वेबसाईटवर पोस्ट करण्यात येतील.
View this post on Instagram
स्वस्तिका मुखर्जीने या प्रकरणाविरोधात कोलकाता येथील गोल्फ ग्रीन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. यासोबतच तिने ईस्टर्न इंडिया मोशन पिक्चर्स एसोसिएशन कडे देखील मदतीची मागणी केली आहे. स्वस्तिकाने या सर्व धमकीच्या मेलची एक कॉपी पोलीस ठाण्यात आणि ईस्टर्न इंडिया मोशन पिक्चर्स एसोसिएशनकडे जमा केली आहे.
View this post on Instagram
एका मुलाखतीमध्ये स्वस्तिकाने सांगितले की, “हे सर्व खूपच विचित्र पद्धतीने सुरु झाले. ‘शिबपूर’ सिनेमाची शूटिंग आणि डबिंग चालू असताना तिला कधीच संदीप सरकारसोबत भेट घालून देण्यात आली नाही. यात अजून एक सह निर्माते अजंता सिन्हा रॉय देखील होते. त्यांच्याशी आमचे बोलणे व्हायचे मात्र अचानक मला सरकारकडून धमकीचे मेल यायला लागले”.
तिने यावेळी हे देखील सांगितले की, संदीप सरकार एक अमेरिकन नागरिक असून, जर तिने त्याला सहकार्य दिले नाही तर तो तिला कधीच अमेरिकेचा व्हिजा मिळू देणार नाही. यानंतर तिने आता ‘शिबपूर’ सिनेमाच्या सर्व प्रमोशनल कार्यक्रमांमधून काढता पाय घेतला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘श्रीकृष्णाच्या गोकुळात गेल्यासारखं वाटलं’ मिलिंद गवळी यांच्या ‘त्या’ पोस्टने जिंकली नेटकऱ्यांची मने
‘घर बंदूक बिरयानी’मध्ये कलाकरांची पाहायला मिळणार वेगवेगळी शैली; त्यामुळे ही बिर्याणी होणार अधिकच चविष्ट










