फोटोमधील ‘या’ गोंडस मुलीला ओळखलंत का? आज आहे बॉलिवूडची सर्वात मोठी ‘फॅशनिस्टा’

बॉलिवूड अभिनेत्री आपल्या सौंदर्याने आणि स्टाईलने चाहत्यांना नेहमीच घायाळ करतात. त्यांची एक झलक चाहत्यांना वेड लावते. या अभिनेत्री मोठ्या झाल्यानंतर जितक्या स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसतात, तितकेच त्यांचे लहानपणीचे फोटो निरागस आणि गोड असतात. सोशल मीडियावर अशाच एका गोड मुलीचा फोटो व्हायरल होत आहे, जी आज बॉलिवूडची सर्वात मोठी फॅशनिस्टा बनली आहे. फॅशनच्या बाबतीत तिच्या स्टाईलला तोड नाही. ही गोंडस मुलगी कोण आहे, हे तुम्ही ओळखू शकता का? चला तर मग जाणून घेऊया ही अभिनेत्री कोण आहे.

कोण आहे ‘ही’ गोड मुलगी
तिच्या चेहऱ्यावरील हे गोंडस हास्य, खोडकर डोळे, लहान केसांची घातलेली छोटी वेणी आणि सुंदर आऊटफिटमध्ये दिसणारी ही मुलगी पाहून प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही अजूनही तिला ओळखू शकला नसाल, तर हा फोटो अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरचा आहे. काही दिवसांपूर्वी हा फोटो सोनम कपूरने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले होते की, “मी एक क्यूट मुलगी होते.” चाहत्यांना सोनमचा हा फोटो खूप आवडत आहे. काहींनी तिच्या गोड हसण्याचेही कौतुक केले, तर काहींनी तिच्या डोळ्यांचे कौतुक केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

चाहत्यांनी केले कौतुक
सोनमने शेअर केलेला हा फोटो पाहून चाहते तिचे जोरदार कौतुक करत आहेत. तिच्या एका चाहत्याने “बेबी तू खूप गोड होतीस, पण तरुणपणी तू खूप हॉट आहेस,” असे लिहिले आहे. आणखी एका चाहत्याने लिहिले की, “बेस्ट इवा, आधीही आणि आताही.” त्याचबरोबर तिच्या या फोटोवर १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

सोनम कपूरला म्हटले जाते ‘फॅशनिस्टा’
सध्या सोनम पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये राहते. तिला बॉलिवूडची सर्वात मोठी ‘फॅशनिस्टा’ म्हटले जाते. सोनम शेवटची चित्रपट ‘झोया फॅक्टर’मध्ये दिसली होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर ती या क्षणी इतर कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसली नाही.

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

सोनम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. तिची प्रत्येक पोस्ट चाहत्यांना खूप आवडते.

सोनम कपूरने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ‘साँवरिया’ चित्रपटातून केली होती. तिने ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘रांझणा’, ‘दिल्ली ६’, ‘नीरजा’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्येही काम केले आहे. सोनम कपूरला ‘रांझणा’ चित्रपटासाठी फिल्मफेअर आणि झी सिने पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्वा! घटस्फोटानंतर बिनधास्त लूकमध्ये दिसली अभिनेत्री समंथा; बेस्ट फ्रेंडसोबतचा मजेशीर व्हिडिओ केला शेअर

-आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’

-अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी

Latest Post