Monday, September 25, 2023

अभिनेत्री, गायिका आणि फॅशन आयकॉन असलेल्या या दिग्गज अभिनेत्रीचे निधन, चाहत्यांवर शोककळा

हॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी प्राप्त होत आहे. संपूर्ण जगात अतिश लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशा ब्रिटिश फ्रांसिसी अभिनेत्री असलेल्या जेन बिर्किन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेन बिर्किन या केवळ अभिनेत्री नाही तर त्या एक उत्तम गायिका आणि फॅशन आयकॉन देखील होत्या. मिळणाऱ्या माहितीनुसार जेन यांच्या केयर टेकर याना त्या घरात मृतावस्थेत सापडल्या. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आले नाही.

लंडनमध्ये जन्मलेल्या जेन बिर्किन यांनी त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे लोकांना आपलेसे केले होते. त्यांनी ‘डेथ ऑन द नाइल’, ‘इविल अंडर द सन’. ‘द स्विमिंग पूल’ आदी अनेक दर्जेदार चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली आणि त्या प्रसिद्ध झाल्या. जेन यांनी ‘द हर्मीस बिर्किन’ या डिजाइनर हॅन्डबॅगला आपले नाव देखील दिले होते. जेन यांना एक मुलगी असून, तिचे नाव चार्लोट गेन्सबर्ग आहे. चार्लोट देखील एक अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.

दरम्यान जेन यांच्या निधनाची बातमी समोर येताच त्यांच्या जगभरातील असंख्य फॅन्समध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अधिक वाचा- 
“वाट्टेल ते बोलण्याचा परवाना…” रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
नादखुळा! रजनीकांतच्या ‘हुकुम’ गाण्याचा टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा