Saturday, June 29, 2024

प्रसिद्ध गायिकेला करावा लागला होता लैंगिक शोषणाचा सामना, वयाच्या १९ व्या वर्षी होती गरोदर

चित्रपटसृष्टीमधून आजकाल खूप हैराण करणाऱ्या बातम्या येत असतात. विशेषत: हॉलिवूडमध्ये अशा अनेक घटना पाहायला मिळतात, ज्या लक्ष वेधून घेतात. खास करून महिलांना तर अनेक वेळा अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो. महिलांना लोभ दाखवून शिकार बनवले जाते. अशा अनेक बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. पण जर ही गोष्ट एखाद्या लोकप्रिय कलाकारांसोबत घडली, तर मात्र संपूर्ण जग हैराण होते. नुकतेच हॉलिवूडमधील लोकप्रिय पॉप गायिका लेडी गागा हिने एक मोठा खुलासा केला आहे. तिने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, एका निर्मात्याने वयाच्या 19 व्या वर्षी तिचे लैंगिक शोषण केले होते. त्यामुळे ती गरोदर राहिली होती.

लेडी गागाने मुलाखतीत सांगितले की, जेव्हा ती 19 वर्षांची होती, तेव्हा एका संगीत निर्मात्याने तिच्यासोबत जबरदस्ती केली होती. त्या निर्मात्याने तिला धमकी दिली होती की, जर तिने तसं नाही केले तर तो तिचे सगळे संगीत अल्बम जाळून टाकेल. “मी गर्भवती होते, तेव्हा मला एका कोपऱ्यात सोडले होते. कारण मी उलट्या करत होती आणि आजारी होती,” असेही ती पुढे बोलताना म्हणाली होती.

या घटनेनंतर ती मानसिकदृष्ट्या पूर्ण खचली होती. त्यांनतर ती खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. या परिस्थितीतून सावरायला तिला खूप वेळ लागला होता. लेडी गागा ही ओप्रा विन्फ्रे आणि प्रिन्स हॅरी यांची टीव्ही सीरिज ‘द मी यू कान्ट सी’जी मानसिक परिस्थितीतून जात आहे, यामध्ये पहिल्या एपिसोड मध्येच तिने या गोष्टींचा खुलासा केला होता.

संगीत क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात तिला या गोष्टींचा सामना करावा लागला हे आठवून ती खूप रडायला लागली होती. तिने सांगितले की, “मी 19 वर्षाची होते तेव्हापासून संगीत क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. एका संगीत निर्मात्याने मला शारीरिक संबंधासाठी अनेक वेळा जबरदस्ती केली, पण मी त्याला नाही असे बोलले होते. मग त्याने मला सांगितले की, तो माझे संगीत अल्बम जाळणार आहे.”

तिने पुढे सांगितले की, “त्याने मला विचारणे बंद नाही केले. मी एकदम शांतच झाले, आणि पुढे मला काहीच आठवत नाही.” तिने सांगितले की, ती त्या व्यक्तीचे नाव कधीच कोणासमोर घेणार नाही. ती म्हणाली की, “मी या मीटू आंदोलनला खूप चांगल्या प्रकारे समजू शकते. मला माहित आहे की, काही व्यक्ती या गोष्टी खूप सहज हाताळतात. पण मी असं नाही करू शकत. मी पुन्हा त्या व्यक्तीचा सामना कधीच नाही करू शकत.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा ऐश्वर्याच्या चाहत्याने तिला लग्नासाठी केले होते प्रपोज; ‘अशी’ दिली होती पती अभिषेकने प्रतिक्रिया

-पांढऱ्या वाघाच्या बछड्यासोबत उर्वशीने केले ‘असे’ काही, पाहून तुम्हीही म्हणाल ‘जिगरबाज’

-एक- दोन नव्हे, तर ऋतिक रोशन एका वेळेला खातो चक्क ८ समोसे! स्वतः च केला होता खुलासा

हे देखील वाचा