ऐश्वर्याला अशाप्रकारे मिळाली होती ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील नंदिनीची भूमिका; दिग्दर्शकाने केला होता खुलासा


दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन नुकतेच 22 वर्ष पूर्ण झाले आहेत. 90 च्या दशकात अजय देवगन, सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांची प्रेम कहाणी सर्वांना खूप आवडली होती. (This is how Aishwarya Rai get Nandini’s character in hum dil de chuke Sanam movie)

या चित्रपटातून हे सिद्ध झाले की, ऐश्वर्या राय ही केवळ सुंदरच नाही, तर एक चांगली अभिनेत्री देखील आहे. यानंतर तिला संजय लीला भन्साळी यांच्या आणखी दोन सुपरहिट चित्रपटंमध्ये काम मिळाले. तिने ‘देवदास’ आणि ‘गुजारिश’ या चित्रपटात काम केले आहे.

हा चित्रपट 22 वर्षापूर्वी 18 जून, 1999 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान, ऐश्वर्या आणि अजयने समीर, नंदिनी आणि वनराज ही पात्र निभावली होती. या चित्रपटातील प्रेम कहाणी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. पण तुम्हाला माहित आहे का?, या चित्रपटात ऐश्वर्या रायला कशी संधी मिळाली होती.

संजय लीला भन्साळी यांनी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, “राजा हिंदुस्तानी स्क्रिनिंगनंतर ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली हाय!! मी ऐश्वर्या राय. मला तुमचे काम खूप आवडले. त्यानंतर आम्ही हात मिळवले. नंतर आमची नजर मिळाली आणि मी तिच्या डोळ्यात आग पहिली. त्यावेळी मी नंदिनीचे पात्र निभावण्यासाठी हिरोईन शोधत होतो. तिला पाहिल्यानंतर मला असे जाणवले की, हीच माझी नंदिनी आहे.”

त्यानंतर त्यांना याचे टेन्शन आले होते की, ऐश्वर्या राय ही एक मिस वर्ल्ड आहे. तिचा चेहरा लोकांसमोर एका मॉर्डन रुपात होता. पण या चित्रपटात तिला पारंपरिक लूक देण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. अगदी साडीपासून ते हेअर स्टाईलपर्यंत सगळेच पारंपारिक होते. तिचा हा लूक अनेकांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘… तो मैं पानी-पानी हो गयी’, भाग्यश्री मोटेच्या हॉट फोटोसोबत लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत

-जेव्हा गायत्री दातार म्हणते, ‘ये मौसम का जादू है मितवा!’ पाहा तिचा लेटेस्ट फोटो

-श्रुती मराठेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; तिच्या ‘हॉट ऍंड ग्लॅमरस’ फोटोला नेटकऱ्यांची पसंती


Leave A Reply

Your email address will not be published.