Saturday, January 28, 2023

नाना पाटेकरांवर दु:खाचा डाेंगर! भावूक पाेस्ट शेअर करत म्हणाले, ‘मी कायम तुझ्यासमोर नतमस्तक होतो’

छोट्या पडद्यासोबतच बाॅलिवूडमध्ये आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम चंद्रकांत गोखले यांचे वयाच्या 77व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक कालाकारांनी विक्रम गाेखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

गेले काही दिवस अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (vikram gokhale) यांची प्रकृती नाजुक होती आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी (25 नाेव्हेंबर)ला ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत हे वृत्तदेखील समोर आलं होतं, पण शनिवारी (दि. 26 नाेव्हेंबर)ला सकाळी त्यांची प्रकृती आणखी ढासळली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विक्रम गोखले यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीने हळहळ व्यक्त केली आहे. राजकीय नेत्यांनसह अनेक अभिनेत्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेते नाना पाटेकर यांनीदेखील त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विक्रम गाेखले यांच्या प्रती हळहळ व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर नाना यांनी अभिनेत्याबरोबरचा एक छान फोटो शेअर केला आहे. फेसबूकवर पाेस्ट शेअर करत नाना यांनी लिहिले की, “विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो …..असेन…तुझ्या सारखा कलावंत आणि माणूस होणे नाही….”

vikram gokhale
Photo Courtesy: Facebook

नाना पाटेकर यांची ही पाेस्ट सध्या साेशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. नाना यांनी ‘नटसम्राट’ या चित्रपटात गणपतराव बेलवलकर ही अजरामर भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांच्यासाेबत विक्रम गोखले यांची खास भूमिकाही होती. जणू काही ही भूमिका या दाेन प्रसिद्ध अभिनेत्यांसाठीच लिहिली गेली हाेती. या चित्रपटात विक्रम गोखले यांच्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली. विक्रम गाेखले यांचे वडील चंद्रकांत गोखले हे देखील मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील कलाकार होते.  याशिवाय त्यांची आजी कमलाबाई गोखले याही अभिनेत्री होत्या. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्या बालकलाकार म्हणून काम केले. (bollywood actor vikram gokhale passes away actor nana patekar shares emotional post on social media)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आयुष्य अपूर्ण आहे मित्रा…’,अनुपम खेर यांची विक्रम गोखलेंबद्दल भावूक पोस्ट

दिलीप कुमार यांच्या 100व्या जयंतीनिमित्त फिल्म फेस्टिवलची घोषणा, अभिनेत्याचे सुपरहिट चित्रपट हाेणार प्रदर्शित

हे देखील वाचा