सर्वांचेच एक स्वप्न असते आणि ते म्हणजे आयुष्यात स्वतःच्या कमाईवर छोटे का होईना मात्र एक घर घ्यायचे. सगळ्यांचेच हे स्वप्न पूर्ण होते असे नाही, मात्र प्रत्येक जणं त्यादृष्टीने नक्कीच प्रवास करतात. कलाकारांना देखील त्यांच्यासाठी घर घ्यायची इच्छा असते. ते देखील थोडे स्थिर झाले की घर शोधायला लागतात. आजच्या काळात तर घर घेणे अतिशय अवघड झाले आहे. त्यामुळे कलाकरांना सुद्धा घर घेताना अनेक वर्ष थांबावे लागते आणि १० वेळा विचार करावा लागतो. मात्र एकदा की घर घेतले की मिळणारा आनंद गगनात मावेनासा असतो. \
नुकतेच मराठीमधील आघाडीची अभिनेत्री, उद्योजिका, सूत्रसंचालक, डान्सर, फिटनेसप्रेमी आदी अनेक भूमिका निभवणाऱ्या प्राजक्ता माळीने तिच्या स्वप्नातील घर घेतले आहे. प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली असून, तिच्या या सुंदर घराचे फोटो देखील शेअर केले आहे. या पोस्टची सध्या कमालीची चर्चा असून, तिच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “स्वप्न साकार…Happy owner of my dream “Farm House”. डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे, एवढीच अट होती. अगदी मनासारखं घर मिळालं. नाव असणार आहे- “प्राजक्तकुंज”. १- प्राजक्तप्रभा २- प्राजक्तराज, ३- प्राजक्तकुंज प्राजक्तत्रयी पुर्ण.
खानदानातली सर्वात सुंदर property, खानदानातल्या सर्वात मोठ्या कर्जासहीत.. फेडू.. फक्त तुमचा आशिर्वाद राहू द्या.”
प्राजक्ताने घेतलेले घर हे कर्जतमध्ये असून त्याचे सुंदर फोटो तिने शेअर केले आहे. या शेअर केलेल्या घराच्या फोटोंमध्ये आपण पाहिले तर निसर्गाच्या सानिध्यात अतिशय सुंदर आणि स्वप्नवत ठिकाणी तिने तिचे हे फार्म हाऊस घेतले आहे. तिचे हे घर मोठे असून, घरामागे धबधबा, हिरवाईने नटलेला डोंगर दिसत आहे. मुख्य म्हणजे तिच्या या घराचे नाव देखील तिने खूपच सुंदर आणि विचार पूर्वक ठेवल्याचे दिसत आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर मराठीमधील अनेकांनी कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे.
अधिक वाचा-
–काय सांगता! अभिनेता अभिषेक बच्चन करणार राजकारणात प्रवेश? वाचा संपूर्ण प्रकरण
–मोठी बातमी टीव्ही अभिनेत्याने एका व्यक्तीवर झाडली गोळी, अभिनेता पोलिसांच्या ताब्यात