छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियॅलिटी शो प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत. त्यापैकीच एक आहे ‘बिग बॉस मराठी‘ हा शो. या शोला प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रतिसादामुळेच आता या शोचे ३ पर्व होऊन गेले. आता ‘बिग बॉस मराठी’ या शोचे चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यासोबतच या शोच्या सूत्रसंचालकाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. कलर्स मराठीने नवीन प्रोमो शेअर केला आहे, यामधून चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार हे स्पष्ट झाले आहे.
प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हेच ‘बिग बॉस मराठी ४’ (Bigg Boss Marathi 4) या शोचे सूत्रसंचालन करणार आहेत. खरं तर यापूर्वी पार पडलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या शोच्या तिन्ही पर्वाचे सूत्रसंचालन हे मांजरेकरांनी उत्तमरीत्या केले आहे. आता पुन्हा एकदा या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे.
View this post on Instagram
कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये मांजरेकर म्हणताना दिसत आहेत की, “खेळाडू नवे, घर नव्हे… आणि होस्ट? एsss वर्गात विद्यार्थी नवीन असतात, पण मास्तर तोच… महेश वामन मांजरेकर. यावर्षी जरा वेगळी शाळा घेऊया.” या बातमीने महेश मांजरेकरांचे आणि ‘बिग बॉस मराठी ४’ या शोचे चाहतेही आनंदी झाले आहेत. आता मांजरेकर ‘बिग बॉस मराठी ४’ या शोमध्ये स्पर्धकांची ‘वेगळी शाळा’ घेताना दिसणार आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस मराठी ४’ या शोचे सूत्रसंचालन कोण करणार याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि महेश मांजरेकर यांच्यापैकी कुणीतरी एक अशी चर्चाही रंगली होती. मागील तिन्ही पर्वाचे सूत्रसंचालन हे मांजरेकरांनीच केले आहे. यापूर्वीच्या ३ पर्वांमध्ये प्रेक्षकांना मांजरेकरांची प्रत्येक शैली खूपच आवडली आहे. मात्र, आता नवीन पर्वात मांजरेकर प्रेक्षकांची कशाप्रकारे शाळा घेतात, हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बॉयफ्रेंड असावा तर असा! तेजस्वीने डोकं फोडून घेतल्यानंतर करणने ‘अशी’ घेतली काळजी, व्हिडिओ व्हायरल
दिशाचा ‘हा’ व्हिडिओ पाहून टायगर श्रॉफही होईल फिदा, तुम्हीही पाहा अभिनेत्रीचा सिझलिंग अंदाज
आख्ख्या जगाने काढलेली आठवण एकीकडे अन् पोटच्या लेकीने काढलेली आठवण दुसरीकडे, जान्हवीची भावूक पोस्ट व्हायरल