रविवारी भारत देशात व्हॅलेंटाईन डे प्रेमीयुगूलांनी अतिशय जोरात साजरा केला. भारतातील अनेक मेट्रो सिटी अर्थात महानगरांमध्ये रस्ते फुलून गेले होते. अनेकांनी यावेळी पहिल्यांदाच आपण प्रेम करत असलेल्या व्यक्तीला प्रेमाची कबूली दिली तर काहींनी सोशल मीडियावर आपल्या प्रेमीजणांचे फोटो शेअर केले. जसा सामान्य नागरिकांनी हा दिवस साजरा केला, तसे आपले बॉलीवूडही यात मागे नव्हते. यात लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दिक्षीतपासून ते बिपाशापर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा दिवस कसा साजरा केला हे सांगितले.
माधुरी दीक्षितने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आपले पती ‘श्रीराम नेने’ यांच्या सोबतचे फोटो शेअर केले. या फोटोत श्रीराम नेने आणि माधुरी एकमेकांच्या डोळ्यात बघताना दिसत आहेत. या फोटो सोबत माधुरीने आपल्या फॅन्सला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
Celebrate love every day ❤️
Happy #ValentinesDay pic.twitter.com/TwoJNwRmA9— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) February 14, 2021
अभिनेत्री बिपाशा बसू हिने देखील वेगळ्याच अंदाजाने व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा पती करन सिंग ग्रोवर याच्या सोबतचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे एकमेकांना किस करतात आणि मग केक कापतात. तीनेही सगळ्या प्रेक्षकांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओ सोबत बिपाशा बसूने एक पोस्ट देखील लिहली आहे. त्या पोस्टमध्ये तिने तिच्या नवऱ्याला आणि प्रेक्षकांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री ट्विंकल खन्नाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत तिच्या फॅन्सला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच गायक नेहा कक्कर हिने देखील तिचा पती रोहन प्रीत सिंग ह्याच्या सोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खास गोष्ट ही आहे की , व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी रोहनने नेहाच्या नावाचा टॅटू हातावर काढला आहे. त्यात त्याने Neha’s man असे लिहाले आहे.
Facebook should not allow first loves on to their platform! My bit this Valentine’s Day for @TweakIndia https://t.co/Gj3RsfrEHj pic.twitter.com/Qz8tw3joTe
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) February 14, 2021
या व्यतिरिक्त अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या जोडीदार सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांना विश केले आहे. तसेच त्यांच्या सगळ्या फॅन्सला देखील वीश केले आहे. या सगळ्या पोस्ट सोशल मिडियावर प्रचंड वेगाने रविवारी व्हायरल झाल्या.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…