टायगर श्रॉफने केले ‘बाघी ३’चे फेल शॉट शेअर; फाडायच्या आधीच फाटला होता शर्ट; व्हिडिओ व्हायरल

Tiger Shroff share a video of some action seen from Baaghi 3


बॉलिवूडमधील ‘ऍक्शन हिरो’ अशी ज्याची ओळख आहे, तो म्हणजे टायगर श्रॉफ. तो त्याच्या शानदार ऍक्शनने आणि डान्सने चर्चेत असतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटात तो ऍक्शन सीन देत असतो. मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या आधी त्याचा ऍक्शन आणि थ्रिलर चित्रपट ‘बागी 3’ हा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने चित्रपटगृहात चांगलीच कमाल केली होती. त्याने ‘बागी 3’ मधील काही व्हिडिओ क्लिप शेअर केल्या आहेत. ज्या सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये टायगर पुन्हा पुन्हा एका सीन साठी रिटेक देताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये टायगर श्रॉफ जोरदार हवेत शर्ट न घालता सरळ उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्याला ते जमत नाही, तर दुसऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये तो मायनस डिग्री तापमानात शर्टलेस उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे त्याने न फाडताच त्याचा शर्ट उडून जातो. त्याचे हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचे चाहते या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत.

हे व्हिडिओ शेअर करून टायगर श्रॉफने लिहिले आहे की, “काही हिरो शॉट फेल झाले आहेत. एक मी की, मला हिरोईक शॉट देण्यासाठी एका जाग्यावर उभा राहत येत नव्हते. कारण माझ्या आजूबाजूला चॉपर चालला होता त्यामुळे सगळीकडे तुफान आल्यासारखे वातावरण होते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर मी माझा शर्ट देखील फाडू शकलो नाही.”

टायगर श्रॉफ हा या दिवसात खूप चर्चेत आहे. त्याचावर कोणत्याही कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरल्यामुळे आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड दिशा पटानी देखील होती. त्यामुळे पोलिसांनी दिशा विरोधात देखील तक्रार दाखल केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोना काळात नागरिकांना जागरूक करण्यासाठी ‘खिलाडी’ अक्षय कुमारने केला व्हिडिओ शेअर, सांगितल्या ‘या’ ५ टिप्स

-‘मोटी हो रहीं हूँ क्या मैं?’, कॉफी घ्यायला पोहोचलेल्या राखी सावंतचा व्हिडिओ व्हायरल

-‘डान्स दीवाने’च्या मंचावर शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित, सोबतच स्पर्धकांनीही दिली साथ


Leave A Reply

Your email address will not be published.