Wednesday, March 27, 2024

झक्कास! टायगर श्रॉफच्या बहिणीने केले हॉट फोटोशूट; तर दिशा पटानीच्या कमेंटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

बॉलिवूडमधील अभिनेत्री जशा त्यांच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चाहत्यांचे लक्ष वेधत असतात, तसेच काही मॉडेल्स देखील आपल्या फिगरमुळे चाहत्यांना घायाळ करतात. अशात अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ चित्रपटांपासून दूर असली, तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कृष्णा नेहमी सोशल मीडियावर आपले वेगवगेळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधते. इंस्टाग्रामवर तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या हटके लूकवर ते नेहमी कमेंट करत असतात.

नुकतेच तिने एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे. तिने त्यातील तीन फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. टायगरची बहीण कृष्णवर्णीय आहे. परंतु बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. तिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती काळ्या रंगाच्या स्पोट्स ब्रा आणि एका काळ्या रंगाच्या पॅन्टमध्ये दिसत आहे. चेहऱ्यावर नो मेकअप लूक आणि ऍटिट्यूडने भरलेले डोळे चाहत्यांना घायाळ करत आहेत. तिने यामध्ये आपली हॉट फिगर दाखवलेली आहे. मॅट्रिक मुंबईमध्ये हे फोटोशूट केले आहे. (Tiger’s sister Krishna Shroff got the photoshoot done by opening the button of the pants, Disha Patani’s comment caught attention)

तिच्या या लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा ससेमिरा केला आहे. अनेकांनी तिला हार्ट इमोजी पाठवलेत. तसेच दिशा पटानीने देखील तिच्या या फोटोंवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. तिने कमेंटमध्ये फायर इमोजी पोस्ट केले आहेत. या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघी एकमेकींच्या फोटोंवर नेहमी कमेंट करत असतात.

कृष्णाच्या फोटोवर तिच्या चाहत्यांनी केलेल्या कमेंटमध्ये एकाने लिहिले आहे की, “वाव, हे, तर सिजलिंग आणि हॉट आहे.” दुसऱ्या एकाने तिच्या शरीरावरील टॅटूविषयी बोलत “सुंदर टॅटू,” असे लिहिले आहे. आणखी एकाने कमेंटमध्ये “विश्व सुंदरी,” असा तिचा उल्लेख केला आहे.

कृष्णा स्वतः देखील फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. ती सोशल मीडियावर फिटनेस संदर्भातील फोटो चाहत्यांसाठी नेहमी शेअर करत असते. ती मॅट्रिक्स फिटनेस सेंटर आणि मॅट्रिक्स फाईट नाईटची संस्थापक देखील आहे. साल २०१५ मध्ये ती ‘ब्लॅक शिप’ या माहितीपटामध्ये झळकली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लग्नाच्या पसरलेल्या बातम्यांवर आदित्य सीलने लावला पूर्णविराम; म्हणाला, ‘यात लपवण्यासारखं आहे तरी काय?’

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’

हे देखील वाचा