चक्क पाण्यात झोपून दिली तिने पोझ; चाहत्यांना पाहायला मिळाली पूजा सावंतची ‘हॉट अन् हटके’ स्टाईल


मराठी सिनेसृष्टीतील मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत तिच्या लुक्सने नेहमी सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या ग्लॅमरस लूकचे लाखो चाहते आहेत. सुंदर चेहरा आणि आकर्षक फिगर असणाऱ्या पूजाची फॅन फॉलोविंगही तगडी आहे. बऱ्याचदा आपले नवनवीन फोटोशूट शेअर करून, ती चाहत्यांना पुरते वेडे करून सोडते.

अलीकडेच पूजा सावंतने एक ब्लॅक ऍंड व्हाईट फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, जो पाहून चाहतेही तिच्या हॉटनेसने हैराण झाले आहेत. यात ती चक्क तलावामध्ये झोपून पोझ देताना दिसली आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, पूजाने कशाप्रकारे स्वतःला पाण्यामध्ये विलीन केलं आहे. यात तिची हॉट अदा अक्षरशः सर्वांना भुरळ पाडत आहे.

पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तिचा हटके अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. फोटोतील तिचा लूक आणि निराळी स्टाईल पाहून तिचे चाहते खूपच प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे चाहत्यांनी तिच्या पोस्टवर अक्षरशः लाईक्सचा आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या फोटोसह पूजाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “तुम्हाला बुडविण्याईतके पुरेसे शक्तिशाली, तुम्हाला स्वच्छ करण्याईतके पुरेसे मऊ आणि तुम्हाला वाचविण्याईतके पुरेसे खोल.”

अभिनेत्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने २०१० मध्ये आलेल्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. २०१५ साली आलेल्या ‘दगडी चाळ’ चित्रपटातील तिची भूमिका खूपच गाजली. २०१८ साली ‘लपाछपी’ या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल पूजा सावंतला ‘दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिला हिंदी चित्रपटांचीही ऑफर आली. २०१९ मध्ये आलेल्या ‘जंगली’ या चित्रपटात ती विद्युत जामवालसोबत दिसली. यात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पाहुणा कोण? मी की तुम्ही??’ सिद्धार्थ अन् मितालीला झालं बिबट्याचं दर्शन; खास पोस्ट होतेय व्हायरल

-सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्यावर बनणार डॉक्युमेंट्री; त्यांच्या मुलांच्याच हाती निर्मितीची धुरा

-‘चूडी, पायल, बिंदिया, काजल…’, साडीमध्ये अधिकच खुललं संस्कृती बालगुडेचं सौंदर्य


Leave A Reply

Your email address will not be published.