Saturday, June 29, 2024

रश्मिका अन् विजय देवरकोंडा आहे रिलेशनशिपमध्ये? व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दिसले सत्य

दक्षिण चित्रपटसृष्टीतील ‘श्रीवल्ली’ म्हणजेच रश्मिका मंदान्ना जगभरात प्रसिद्ध आहे. ‘पुष्पा‘ चित्रपटात रश्मिका दिसल्यानंतर ती आणखीनच प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियावर रश्मिकाचा जबरदस्त चाहता वर्ग आहे. अशात अनेक दिवसांपासून या अभिनेत्रीचे नाव विजय देवरकोंडासोबत जोडले जात आहे, परंतु दोघांनीही याबाबत कधीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, अशातच आता रश्मिकाच्या वाढदिवसाचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यानंतर चाहत्यांच्या संशय अधिकच पक्का हाेत आहे.

अलीकडेच सोशल मीडियावर काही फोटो समोर आले आहेत, ज्यात दोन्ही स्टार्स एकच लोकेशन शेअर करताना दिसत आहेत. त्यामुळे या दोघांचेही अफेअर असल्याची चर्चा चाहत्यांनी पुन्हा एकदा सुरू केली आहे. अलीकडेच जेव्हा रश्मिकाने तिच्या वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर केला तेव्हा त्यात एक जागा दिसली जिथून काही दिवसांपूर्वी विजय देवरकोंडा यांनीही फोटो शेअर केले हाेते.

हे फाेटाे पाहून चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की, रश्मिका आणि विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत आहेत आणि एकाच घरात एकत्र राहत आहेत. यापुर्वी जेव्हा त्यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येऊ लागल्या तेव्हा रश्मिकाने प्रतिक्रिया देण्यास वेळ न लावता लगेच सोशल मीडियावर पोस्ट केली. रश्मिकाने लिहिले, ‘चला, बाबू एवढा विचार करू नका.’ यासोबतच तिने हसणारा व्हिडिओही बनवला हाेता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anand Deverakonda (@ananddeverakonda)

मात्र, हे घर रश्मिका मंदान्ना हिचे नसून विजय देवरकोंडाचे असल्याचे नंतर समोर आले. कारण, तीच जागा अभिनेत्याचा भाऊ आनंद देवरकोंडा याच्या जुन्या व्हिडिओंमध्ये दिसत आहे.(tollywood actress rashmika mandanna and vijay deverakonda confirm the rumoured of their relationship know details)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एंगेजमेंटच्या अफवांदरम्यान परिणीती चाेप्रा दिसली विमानतळावर; पॅपराझींला लाजत म्हणाली…

रामायणातील ‘सीता माँ’च्या मुखातून हनुमान चालीसा ऐकून चाहते झाले थक्क; म्हणाले, ‘तुमच्या तोंडून…’

हे देखील वाचा