Monday, July 15, 2024

दाक्षिणात्य सिनेसृष्टी शोकसागरात, ‘या’ दिग्गज दिग्दर्शकाचे दुःखद निधन

एकापाठोपाठ एक दमदार चित्रपट तयार करुन सर्वत्र चर्चेत असलेल्या दाक्षिणात्य चित्रपट जगताला धक्का देणारी बातमी सध्या समोर आली आहे. दाक्षिणात्य चित्रपट जगताचे प्रसिद्ध दिग्दर्शक सरथ (Sarath) यांचे १ एप्रिल २०२२ ला दुखःद निधन झाले आहे. हैद्राबादच्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच काळापासून ते कॅन्सर रोगाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही लढाई शेवटी संपुष्टात आली. या बातमीने दाक्षिणात्य चित्रपट जगताला मोठा धक्का बसला असुन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, दाक्षिणात्य चित्रपट जगताला प्रसिद्ध दिग्दर्शक सरथ यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. सरथ हे दाक्षिणात्य सिनेमा क्षेत्रातील गाजलेले दिग्दर्शक होते. त्यांनी आपल्या कारकिर्दित अनेक दमदार चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांनी चडस्पातु मोगुडू या १९८६ मध्ये आलेल्या चित्रपटातुन आपल्या दिग्दर्शनाला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी डियर नावाचा एक गाजलेला चित्रपटही दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात सुमन आणि भानुप्रियाने मुख्य भूमिका साकारली होती. त्यांना दिग्दर्शक म्हणून खरी ओळख १९८९ मध्ये आलेल्या अग्नि नक्षत्रम चित्रपटाने मिळवून दिली होती. या चित्रपटात शोभम बाबु, मोहन बाबु, आणि कल्याण चक्रवर्ती यांनी भूमिका साकारली होती.

१९९१ मध्ये सरथ यांनी सुमन, नगमा, मोहन बाबू यांच्या प्रमुख भूमिका असलेला पेडिन्टल्लुडू या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला जोरदार लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली ज्यानंतर त्यांनी आयुष्यात कधीही मागे वळुन पाहिले नाही. त्यांनी आपले जास्तीत जास्त चित्रपट सुमन आणि नंदामुरी बालकृष्ण यांच्यासोबत चित्रपट निर्मिती केली होती. कारण त्यांच्या चित्रपटात जास्तीत जास्त एक्शन सीन पाहायला मिळायचे. या दिग्गज दिग्दर्शकांनी ‘पेड्डा अन्नय्या’, ‘सुपर मोगुडू’, ‘पेडिंटलुडू’, ‘सुलतान’, ‘अब्बाई गॅरी पेली’, ‘वामशानिकी ओक्कडू’, ‘चिन्ना अल्लुडू’ आणि काही नावांसारखे बरेच हिट चित्रपट दिले. त्यांनी सुमनसोबत आठ आणि बलैयासोबत चार चित्रपट केले. 20 वर्षांच्या किंवा 2 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी वीस तेलुगू चित्रपटांचे दिग्दर्शन केले. अभिनेता नंदामुरी बालकृष्ण यांनी सरथ यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

त्यांच्या पटकथा आणि दिग्दर्शन कौशल्यामुळेच त्यांना सुप्रसिद्ध तेलुगू अभिनेता नंदामुरी बालकृष्णा यांचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. चित्रपट निर्माते सरथ यांच्या आकस्मिक निधनामुळे तेलुगू चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. या प्रसिद्ध दिग्दर्शकांवर शनिवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा