Thursday, July 31, 2025
Home हॉलीवूड वयाच्या 61 व्या वर्षी पुन्हा तुटले टॉम क्रूझचे हृदय, 25 वर्षांनी लहान असलेल्या प्रेयसीसोबत ब्रेकअप

वयाच्या 61 व्या वर्षी पुन्हा तुटले टॉम क्रूझचे हृदय, 25 वर्षांनी लहान असलेल्या प्रेयसीसोबत ब्रेकअप

हॉलिवूड स्टार टॉम क्रूझबाबत (Tom Criuse)एक मोठी बातमी समोर आली आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी मिशन: इम्पॉसिबल या अभिनेत्याचे पुन्हा एकदा हार्ट ब्रेक झाले आहे. टॉम क्रूझ आणि त्याची रशियन गर्लफ्रेंड अलेसिना खैरोवा यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॉम क्रूझने त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे नाते संपुष्टात आणल्याचा दावा केला जात आहे. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. 13 फेब्रुवारी रोजी, अभिनेत्याने सोशल मीडियावर अल्सीना खैरोवासोबतचे नाते अधिकृत केले. आणि या घोषणेच्या अवघ्या 10 दिवसांनी त्यांच्या ब्रेकअपची बातमीही समोर आली. टॉम क्रूझने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अल्सीना खैरोवाचा फोटोही डिलीट केला आहे.

दोघांच्या वयात 25 वर्षांचा फरक आहे. त्यांच्या ब्रेकअपची अनेक कारणे सांगितली जात आहेत. काही लोक म्हणतात की टॉम क्रूझने अल्सीना खैरोवाचे हृदय तोडले, तर बरेच लोक यासाठी त्याच्या गर्लफ्रेंडला दोष देतात. गेल्या काही महिन्यांपासून दोघेही लंडनमध्ये एकत्र राहत असल्याच्या बातम्या येत आहेत. यावेळी अभिनेत्याने आपल्या मैत्रिणीच्या मुलांचीही भेट घेतली. या भेटीनंतरच टॉम क्रूझने अल्सीनापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

टॉम क्रूझ आणि अलेसिना खैरोवा लंडनमध्ये एअर ॲम्ब्युलन्स चॅरिटीच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या गाला डिनर दरम्यान दिसले. दोघेही इथे वेगळे पोहोचले होते, त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या पसरू लागल्या. मात्र, आतापर्यंत दोघांनीही या वृत्तांवर कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

अभिनेत्याचे हृदय तुटण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याच्या अनेक मैत्रिणी होत्या. टॉम क्रूझचे तीन लग्नही अयशस्वी झाले आहेत. टॉम क्रूजला या लग्नांमधून तीन मुलेही आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, कोर्टाने लूक आउट सर्क्युलर केले बंद
पुन्हा एकदा त्या गोड चेहऱ्याने गाजवलं सोशल मीडियाचं मार्केट, राहा कपूरचे फोटो व्हायरल

हे देखील वाचा