Friday, March 29, 2024

‘स्पायडर मॅन: नो वे होम’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ; काही दिवस अगोदरच लीक झाला होता व्हिडिओ

नुकताच ‘स्पायडर मॅन: नो वे होम’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ करण्यात आला आहे. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर एक दिवस अगोदरच सोशल मीडियावर लीक झाला होता. मात्र आता त्याचा अधिकृत ट्रेलर रिलीझ झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटाचा ट्रेलर पूर्णपणे सस्पेन्सने भरलेला आहे. डॉ. स्ट्रैंज आणि स्पायडरमॅन यांच्यातील होतं असलेली लढाई या हा ट्रेलरचे आकर्षण वाढवत आहे.

ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, स्पायडरची ओळख सर्वांना माहित होते. पोलीस त्याची चौकशी देखील करत आहेत. पीटर पार्कर ‘स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम’ मध्ये आपली ओळख जगासमोर आल्यानंतर येणाऱ्या अडचणींना तोंड देताना दिसत आहे. तर दुसरीकडे झेंडया एमजे यात त्याला सांत्वना देण्याचा प्रयत्न करताना दिसतो. (Trailer for ‘Spider-Man: No Way Home’ released, video leaked before release)

‘स्पायडर मॅन: नो वे होम’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच ऑनलाइन लीक झाला आहे. त्यानंतर चित्रपटाचे निर्माते खूप अस्वस्थ दिसत आहेत. हा ट्रेलर ऑनलाईन साइट्सवरून काढण्यासाठी त्यांनी खूप मेहनतही घेत आहेत. त्याचे बरेच व्हिडिओ चाहत्यांनी यूट्यूब आणि इतर अनेक प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहेत. सध्या हे सर्व व्हिडिओ काढून टाकण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये सोनी पिक्चर्स मूव्हीज आणि शो मधील कंटेट आहे, असा मॅसेज देत त्यांनी कॉपीराइटच्या आधारे ते ब्लॉक केले आहे.

अनेकांनी शेअर केला होता लीक ट्रेलर
परंतु इंस्टाग्राम आणि इतर पोर्टलवरील काही पेज अजून हा लीक झालेला ट्रेलर होस्ट करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ मोबाईल स्क्रीनच्या रेकॉर्डिंगचा आहे. ज्यावर ट्रेलर चालवला जात आहे. यामध्ये स्क्रीनवर एक मोठा वॉटरमार्कही दिसतो आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘धक धक गर्ल’च्या अदांनी पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका; लेटेस्ट फोटोशूटने केला इंटरनेटवर राडा

-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम

-‘अक्षय कुमारसोबत चित्रपट साईन नको करूस’, ट्रोलर्सच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली कियारा आडवाणी

हे देखील वाचा