Sunday, January 26, 2025
Home साऊथ सिनेमा पंजाबी पुत्तर साकारणार दाक्षिणात्य सिनेमात मुख्य भूमिका, हरभजन सिंगच्या तमिळ सिनेमाचा ट्रेलर रिलीझ

पंजाबी पुत्तर साकारणार दाक्षिणात्य सिनेमात मुख्य भूमिका, हरभजन सिंगच्या तमिळ सिनेमाचा ट्रेलर रिलीझ

चित्रपट सृष्टीमध्ये अनेक मोठं मोठे कलाकार आहेत जे आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालत आहे. यामध्ये कोणी डॉक्टर, इंजीनिअर, तर कुणी वकील आणि अभिनयाचे शिक्षण घेतलेले असे अनेक वेगवेगळे पदवीधर आहेत. काही क्रिकेटपटू देखील अभिनयाकडे वळलेले आपल्याला दिसतील. अजय जडेजा, श्रीशांत, विनोद कांबळी आदी अनेक खेळाडूंची नावे या यादीत आहे. ग्लॅमर जग आणि क्रिकेटर्स यांचे नाते खूपच जुने आहे. अनेक क्रिकेटर्सने या मनोरंजन विश्वातल्या अभिनेत्रींसोबत लगीनगाठ बांधली आहे. आधी क्रिकेटर आणि आता अभिनेता म्हणून नवीन इंनिंग सुरु करणाऱ्या या यादीत आता माजी फिरकीपटू हरभजनसिंगचे देखील नाव जोडले गेले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग त्याच्या आयुष्यातील सेकंड हाल्फ खेळण्यास सज्ज झाला आहे. क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्या फलंदाजांना फिरकीमुळे बाद करणारा भज्जी आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. हरभजन लवकरच ‘फ्रेंडशिप’ या तमिळ भाषिक चित्रपटातून मुख्य भूमिका साकारत मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल बोलायचे झाले, तर या ट्रेलरमध्ये एका मित्रांचा ग्रुप, त्यांचे कॉलेजमधील मुलांचे आयुष्य. मित्रांची मज्जा मस्ती या सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. सर्व सुरळीत दिसत असतानाच अचानक हरभजन सिंग आणि त्याच्या मित्रांना काही पोलीस येऊन घेऊन जातात. त्याचे कारण ट्रेलरमध्ये समजू शकले नाही. कारण आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या तामिळ आणि तेलगू भाषेमध्ये प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर हरभजनने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की,” थ्रिलर, सस्पेंस, कॉमेडी, रिवेंज, एक्शन, सेंटिमेंट आणि इमोशन्स.या सर्व गोष्टी तुम्हाला या सुपर एंटरटेनमेंट या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन पॉल राज आणि शाम सूर्या यांनी केले आहे. चित्रपटामध्ये ऍक्शन किंग अर्जुन एक महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. १७ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

हरभजनची क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी आपण सर्वानी पाहिलीच आहे. त्याने अनिल कुंबळेनंतर सर्वात जास्त विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला आहेत. साल २००४ मध्ये त्याने ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात त अगदी काही मिनीटांसाठीच स्क्रीनवर दिसला होता. त्यानंतर तो चार चित्रपटांमध्ये काही भूमिकांमध्ये झळकला. त्याच्या या आगामी चित्रपटासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारसोबत केले होते पदार्पण; मात्र सुंदरतेने वेड लावलेली शांतीप्रिया आज का राहतेय बॉलिवूडपासून दूर?

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा