×

भोजपुरीमधील ‘हे’ कलाकार लवकरच बांधणार लग्नगाठ, सोशल मीडियावर दिली माहिती

भोजपुरी अभिनेत्री निधी झा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. निधी झा आणि यश कुमार आता एकमेकांचे कायमचे राहणार आहेत. भोजपुरी स्टार्स यश कुमार आणि निधी यांनी त्यांच्या लग्नाची तारीख समोर ठेवली असून, त्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. निधी झाने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा आणि यशचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर लग्नाची तारीखही लिहिली आहे.

मनोरंजन क्षेत्रातून या वर्षी आनंदाच्या बातम्या येत आहेत. काहींचे हात पिवळे झाले आहेत, तर काहींच्या घरात चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. भोजपुरी कलाकार निधी झा आणि यश कुमार २ मे २०२२ रोजी लग्न करणार आहेत, म्हणजेच त्यांच्या लग्नाला अजून काही दिवस उरलेले नाहीत. त्यांच्या लग्नाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या सुंदर जोडप्याच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्यांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर आगीसारखी पसरली असून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Nidhi Jha (@nidhijha05)

निधी झा आणि यश कुमार ही भोजपुरी इंडस्ट्रीतील सुपरहिट जोडींपैकी एक आहेत. नुकतीच दोघांची एंगेजमेंट झाली. निधीने इन्स्टाग्रामवर त्याचे फोटोही शेअर केले आहेत. यश आधीच विवाहित आहे, त्याची पत्नी भोजपुरी अभिनेत्री अंजना सिंह आहे, जिच्यापासून त्याने घटस्फोट घेतला आहे.

हेही वाचा-

Latest Post