Saturday, June 29, 2024

करणने ‘तुम क्या मिले’ हे गाणे ‘गुरू’ यश चोप्रा यांना केले समर्पित, ‘या’ कारणामुळे मागितली आलियाची माफी

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी‘ या चित्रपटातील ‘तुम क्या मिले‘ हे गाणं लवकरच रिलीज होणार आहे. रिलीजपूर्वी, चित्रपटाचे दिग्दर्शक करण जोहरने चित्रपटातील गाण्याचे एक दृश्य शेअर केले आणि दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासाठी भावूक नोट लिहिली.

दिग्दर्शक करण याने त्याच्या अधिकृत इंस्टग्राम अकाऊंंटवर एक पाेस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यानी लिहिले, ‘काही तासांत ‘तुम क्या मिले’ तुमचे हाेईल. मला या चित्रपटात एक प्रेमगीत हवे होते, जे मी माझे गुरू यश चोप्रा यांना समर्पित करू शकेन. मग मी स्वत:ला सांगू लागलो की, तू मॅच नाही करणार किंवा तसे करण्याची हिम्मतही नाही करणार, पण फॅन बॉय आणि स्नो, शिफॉन, काश्मीरचे भव्य स्थान आणि राेमान्सच्या प्रेमीने मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. प्रीतम दादा आणि मला खूप दिवसांपासून असं गाणं बनवायचं होतं. वैभवी मर्चंटने या गाण्याची संपूर्ण जबाबदारी स्वत:वर घेतली आणि यश चोप्राच्या प्रियकराप्रमाणे हे गाणे अतिशय सुंदरपणे पूर्ण केले.

करणने त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “मुलीच्या जन्मानंतर आलियाचे हे पहिले शूट आहे आणि मनीष मल्होत्राच्या शिफॉनमध्ये थंडीत तिचे शूट केल्याबद्दल मी माफी मागतो. रणवीर घाबरला होता. कारण, हे त्याचं पहिलं लिप सिंक माउंटन लव्ह साॅंग होतं. म्हणून आम्ही इश्क वाला शिफॉन साडीच्या मैदानात परत आलो आहोत. मला आशा आहे की, आम्हाला जेवढी थंडी जाणवली होती तितकेच प्रेम तुम्हालाही वाटेल. हे तुमच्यालाठी आहे यश काका…तुमचा चाहता करण”

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

आलियाने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न केले आणि 6 नोव्हेंबर 2022 रोजी मुलगी राहा हिला जन्म दिला. आलियाने या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण तिच्या प्रेग्नंसीपुर्वी केले होते. मात्र, राहाच्या जन्मानंतर तिने या गाण्यासाठी शूट केले आहे.

रणवीर आणि आलियासोबतच धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन देखील ‘रॉकी और राणी की प्रेमकहाणी’मध्ये आहेत. हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. (tum kya mile song karan johar says actress alia bhatt shot soon after daughter rahas birth )

अधिक वाचा-
असिनने इन्स्टावरुन पती राहुल शर्मासोबतचे फाेटाे केले डिलीट, ‘गजनी’ अभिनेत्रीचे लग्न मोडणार ?
गुलाबी साडी नेसून अक्षरा सिंगने घातली नवऱ्याला भुरळ, अभिनेत्रीचे ‘कनबलिया से धक्का’ गाणे रिलीज

हे देखील वाचा