Saturday, April 20, 2024

चाहत्यांच्या नजरेला सलाम! तुषार कपूरने आईच्या वाढदिवशी शेअर केलेल्या फोटोतून फॅन्सनी शोधला ‘सुपरस्टार’

बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकार सोशल मीडियाचा वापर करतात. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या- वाईट घटना ते आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. याला सुपरस्टार जितेंद्र कपूर यांचा मुलगा म्हणजेच अभिनेता तुषार कपूरही अपवाद नाही. तो अधिक प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय नसला, तरी तो चाहत्यांशी संवाद साधत असतो. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस येत असतात. अशाच प्रकारे आता त्याने सोमवारी (१ फेब्रुवारी) आपल्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताच त्याच्या चाहत्यांनी त्या फोटोतील सुपरस्टार शोधून काढला आहे.

त्याने शेअर केलेला हा फोटो त्याच्याच वाढदिवशी काढण्यात आला होता. यामध्ये शोभा कपूर आपला मुलगा तुषार कपूरला केक चारताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तुषारने कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…धन्यवाद… प्रत्येक दिवस!!”

चाहत्यांनी ऋतिक रोशनला काढले शोधून
तुषार कपूरने फोटो शेअर करताच, चाहत्यांनी त्या फोटोतून सध्याच्या बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशनला शोधून काढले. तो केकच्या बाजूला थांबलेला दिसत आहे. चाहत्यांनी म्हटले की, ऋतिक आपल्या लहानपणीही खूप गोड दिसत आहे.

‘फायटर’ चित्रपटात दिसणार ऋतिक
ऋतिक रोशनच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला होता. या खास दिवशी त्याच्या आगामी ‘फायटर’ चित्रपटाची घोषणा झाली होती. त्यामध्ये तो पहिल्यांदा दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकरी आंदोलनात गान कोकिळा लता मंगेशकर यांची उडी, पॉप स्टार रिहानाच्या ट्विटला दिले प्रत्युत्तर; म्हणाल्या…

विराट आणि अनुष्कासोबतच ‘या’ कलाकारांच्या मुलांची नावंही आहेत चर्चेत, जाणून घ्या ‘वामिका’पासून ‘तैमूर’पर्यंतच्या नावांचा अर्थ

श्वास रोखून धरा! १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री; सिनेमाचे पोस्टरही झाले रिलीझ

हे देखील वाचा