Monday, April 15, 2024

छाेट्या पडद्यावरील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यावर काेसळला दु:खाचा डाेंगर; हंबरडा फाेडत म्हणाला,’माझ्या प्रिय,…’

उत्तरन‘ टीव्ही शोचा स्टार नंदिश संधू याचा भाऊ ओंकार सिंग संधू यांचे निधन झाले आहे. या बातमीनंतर संधू कुटुंबीयावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. या बातमीची माहिती खुद्द अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दिली आहे. या पोस्टसोबत त्यांनी भावासाठी हृदयस्पर्शी नाेटही लिहिले आहेत. अभिनेत्याचा भाऊ ओंकार कर्करोगाशी झुंज देत होता. अशा परिस्थितीत ओंकारने 28 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत नंदिशच्या भावावर अंतिम संस्कार करण्यात आला आहे.

नंदिश सिंधू (nandish singh sandhu) याने आपल्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत आपली व्यथा शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की, “आता त्यांचा भाऊ ओंकार नाही.” ओंकारचा फोटो शेअर करून त्याने भावाला निरोप दिला. अभिनेत्याने आपल्या भावासाठी भावूकपणे लिहिले, “माझ्या प्रिय, नेहमी हसत रहा, जगात आनंद पसरवत रहा, आमच्या आयुष्याला स्पर्श करणारा, तू असाच कायम स्मरणात राहशील, तू खरा सेनानी आहेस. चला पुन्हा कधीतरी भेटूया जगाच्या पलीकडे, तू आम्हा सर्वांना लढायला शिकवलंस शेवटपर्यंत तेही स्माइलसाेबत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by NANDISH SINGH SANDHU (@nandishsandhu)

कॉमेडियन भारतीने नंदिशच्या भावाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तिने कमेंट करत ‘RIP’ असे लिहिले, तर अभिनेत्री आकांक्षा पुरी यांनी लिहिल, ‘हे खूप मोठे नुकसान आहे, हे जाणून खूप दुःख झाले, या कठीण काळात तुमच्या कुटुंबाला बळ मिळो.’, शरद मल्होत्रा ​​यांनी लिहिले, ‘ओम शांती.’ अशात पूजा गोरने शाेक व्यक्त करत लिहिले, ‘ऐकून खूप वाईट वाटले. तुमच्या कुटुंबाला बळ मिळो.’ अशा प्रकारे चाहत्यांसह टिव्ही कलाकार अभिनेत्याच्या पाेस्टवर शाेक व्यक्त करत आहेत.(tv actor nandish singh sandhu brother onkar sandhu death uttaran actor get emotional )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस
सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

हे देखील वाचा