Friday, March 29, 2024

नागीन फेम आशका गरोडियाचा हवेत केलेला योगा पाहिला नाही तर मग काय पहिलं? नेटकऱ्यांनी देखील केले तोंड भरून कौतुक

शरीराला तंदरुस्त आणि फिट ठेवण्याचा अतिशय उत्तम मार्ग म्हणजे योगा. शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य अशा प्रत्येक अवयवाला चालना देणारा प्रकार म्हणजे ‘योगा’. सुरुवातीला फक्त काही लोकांपुरताच मर्यादित असणारा हा योगा मागच्या काही वर्षांपासून सर्वात जास्त चर्चेत आला आहे. योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खूप केले जाते. अनेक कलाकारांमुळे आणि चित्रपटसृष्टीमुळे योगाला एक ग्लॅमरस रूप प्राप्त झाले आहे.

मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगाचा आधार घेतात. अनेक अभनेत्री योगा करतानाचे त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट देखील करत असतात. यातलीच एक टीव्ही अभिनेत्री म्हणजे आशका गोराडिया. टेलिव्हिजनवर अनेक नकारात्मक भूमिका साकारणारी आशका एकता कपूरच्या ‘नागीन’ भाग २ मध्ये सुद्धा दिसली होती. आशका तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक असते. ती कितीही बिझी असली तरी ती योगा करतेच.

आशका नेहमी तिचे योगा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतच असते. सध्या आशका चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, तिने नुकताच पोस्ट केलेला तिचा योगा पोजमधला फोटो. या फोटोमध्ये ती तिचा नवरा ब्रेन्ट गॉबल सोबत अतिशय वेगवेगळ्या आणि खतरनाक पोज देत आहे. तिचा हा फोटो पाहून फॅन्स खूप आश्चर्यचकित झाले आहे. यापूर्वी देखील तिने तिचे असे फोटो पोस्ट केले, पण हा फोटो त्यासर्व फोटोंपेक्षा खतरनाक आहे. तिचे फॅन्स या फोटोला खूप लाइक्स आणि कमेंट्स देत तिचे कौतुक करत आहेत.

या फोटोमध्ये आशका तिच्या नवऱ्याच्या मांडीवर एका पायावर उभी आहे. यात तिने तिच्या नवऱ्याने एकमेकांनाच जो तोल सांभाळला आहे, त्याबद्दल सर्वच चाहते आणि कलाकार तिचे कौतुक करत आहेत. आशकाचा हा हॉट आणि बोल्ड योगा सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे.

यासोबतच तिने तिचे अजून भरपूर हॉट योगाचे फोटो इनस्टाग्रामवर शेयर केले आहेत.

हे देखील वाचा