रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाचा जल्लोष सुरू असतानाच हिंदी मनोरंजन जगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ हिंदी टेलिव्हिजन प्रेझेंटर आणि अभिनेत्री मंजू सिंग (Manju Singh) यांचे निधन झाले आहे. याबाबत माहिती देताना गीतकार, गायक आणि पटकथा लेखक स्वानंद किरकिरे यांनी मंजू सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुःखद बातमीने बॉलिवूड जगतावर शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी याबाबत दुःख व्यक्त करताना मंजू सिंग यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, हिंदी मालिका जगतातील जेष्ठ अभिनेत्री आणि प्रेजेंटेटर मंजू सिंग यांच्या निधनाची वार्ता समोर आली आहे. लेखक स्वानंद किरकिरे यांनी याबाबतची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन दिली आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करताना, “मंजू सिंग आता नाहीत. दूरदर्शनसाठी स्वराज हा कार्यक्रम लिहिण्यासाठी मंजूजींनी मला दिल्लीहून मुंबईत आणले! डीडीसाठी त्यांनी एक कहानी, शो टाईम इत्यादी अनेक अप्रतिम शो केले होते. हृषीकेश मुखर्जींच्या गोलमाल मधील प्रेमळ पात्र आमच्या सर्वांच्या लाडक्या मंजूजी आम्ही तुमचे प्रेम कसे विसरु शकतो भावपूर्ण श्रध्दांजली” अशा भावूक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांनी दूरदर्शनमध्ये त्यांच्यासोबत काम केलेल्याची आठवण ही सांगितली आहे.
मंजू सिंह जी नहीं रही ! मंजू जी मुझे दिल्ली से मुंबई लायी थी दूरदर्शन के लिए उनका शो स्वराज लिखने ! उन्होंने DD के लिए कई नायब शोज़ एक कहानी, शो टाइम आदि बनाए थे . हृषिकेश मुखर्जी की फ़िल्म गोलमाल की रत्ना हमारी प्यारी मंजू जी आपका प्यार कैसे भूल सकता है .. अलविदा ! pic.twitter.com/aKFvMJeFYF
— Swanand Kirkire (@swanandkirkire) April 15, 2022
मंजू सिंग या भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध निर्मात्या होत्या. त्यांनी स्वराज, एक कहानी, शो टाईम इत्यादी कार्यक्रमांची निर्मिती केली. प्रेमाने ‘दीदी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंजू ‘खेल टॉइज’ या लहान मुलांच्या कार्यक्रमाच्या निवेदिका होत्या. हा कार्यक्रम सुमारे सात वर्षे चालला. याशिवाय त्यांनी ह्रषिकेश मुखर्जीच्या गोलमाल चित्रपटातही रत्नाची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेतील अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. मंजू सिंग यांनी त्यांच्या कार्यक्रमात अनेक राष्ट्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर प्रकाश टाकला. त्यांनी 1983 मध्ये शोटाइमद्वारे टेलिव्हिजन निर्मात्या म्हणून पदार्पण केले. त्यांचा ‘एक कहानी’ हा कार्यक्रम अनेक प्रादेशिक भाषांमधील साहित्यिक लघुकथांवर आधारित होता. देशभरातील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला त्यांचा माहितीपट-नाटक मालिका अधिकार कार्यक्रमही विशेष चर्चेत आला होता. जो महिलांच्या कायदेशीर हक्कांवर आधारित होता.
अलिकडच्या काळा मंजू सिंग लहान मुलांसाठी आणि तरुणांसाठीच्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांशी संबंधित योगदान देत होत्या. 2015 मध्ये, सर्जनशील कला आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांनाभारत सरकारने त्यांची केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ (CABE) सदस्य म्हणून नामांकन केले होते. या हरहुन्नरी अभिनेत्रींच्या मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा