Saturday, March 2, 2024

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम लता सभरवालला गंभीर आजार; म्हणाली, ‘कृपया… माझ्यासाठी प्रार्थना करा’

छाेट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है‘ने भरभरुन प्रेक्षकांचे मनाेरंजन केले. या मालिकेत अक्षराच्या आईची म्हणजेच राजश्री गोयल माहेश्वरीची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री लता सभरवाल हिने साकारली होती. अशात राजश्री यांची भूमिका उत्तमरित्या साकारणाऱ्या लता सभरवाल हिच्या प्रकृतीबाबत धक्कादायक बातमी समाेर येत आहे. खरे तर, लता हिची खऱ्या आयुष्यात प्रकृती फारशी ठीक नाही आहे. तिच्या तब्येतीबद्दल मोठे अपडेट देत तिने चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील राजश्री म्हणजेच लता सभरवाल (lataa saberwal) हिने आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. लता हिचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहाता वर्ग आहे, पण तिच्या एका पोस्टमुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.

लता सभरवाल हिने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना कळवले आहे की, तिच्या घशात काही गाठी निर्माण झाल्या आहेत, ज्यावर वेळीच उपचार न केल्यास तिला तिचा आवाजही गमवावा लागू शकतो.

तिने आपल्या पोस्टमध्ये चाहत्यांना सांगितले की, “कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्या घशात काही गाठी तयार झाल्या आहेत, ज्यामुळे मला बोलण्यात अडचण येत आहे. मी नुकतेच ईएनटीकडून आले आहे. माझ्या घशात गाठ आहे, त्यासाठी मला आठवडाभर पूर्ण विश्रांती घ्यावी लागणार आहे. मला स्टिरॉइड्स देण्यात आले आहेत. कारण, हा एकमेव उपचार आहे. ही एक अतिशय गंभीर समस्या आहे, जर मी वेळेत लक्ष दिले नाही, तर माझा आवाज कायमचा जाऊ शकतो. त्यामुळे मला थोडी भीती वाटत आहे.”

अभिनेत्रीच्या या पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. लता सभरवाल हिच्या पोस्टवर कमेंट करून तिचे मित्र आणि चाहते ती लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.( tv actress lataa saberwal gets diagnosed with early throat nodules her voice may stop any time actress say pray for me)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
संजू बाबाकडे आहे लाखोंची किंमत असणारे लक्झरी घड्याळं कलेक्शन, नजर टाका त्याच्या कलेक्शनवर

दुःखद! ‘या’ टेलिव्हिजन, चित्रपट अभिनेत्रीच्या पतीचे निधन, बाथरूममध्ये आढळले मृत अवस्थेत

हे देखील वाचा