Saturday, May 23, 2026
Home अन्य लय भारी! ‘या’ अभिनेत्रीने थाटला संसार, शिव- पार्वतीच्या विवाहस्थळी घेतले सात फेरे

लय भारी! ‘या’ अभिनेत्रीने थाटला संसार, शिव- पार्वतीच्या विवाहस्थळी घेतले सात फेरे

छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील कलाकार लग्नबंधनात अडकणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. काही कलाकारांनी तर सात फेरे घेऊन चाहत्यांना आनंदाची बातमीही दिली आहे. यामध्ये आता एका अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. टीव्ही अभिनेत्री निकिता शर्मा लग्नबंधनात अडकली आहे. तिने शिव- पार्वती यांच्या विवाहस्थळी म्हणजेच त्रियुगीनारायण मंदिरात जाऊन रोहनदीप सिंगसोबत लग्नाची गाठ बांधली आहे.

या खास क्षणी तिच्या कुटुंबातील आणि जवळच्या मित्रमंडळींची उपस्थिती होती. लग्नानंतर निकिताने आपल्या लग्नाचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “महादेवाच्या आशीर्वादाने जीवनाची नवीन सुरुवात करत आहे.” या पोस्टनंतर तिच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय. (TV Actress Nikita Sharma Wedding In Triyuginarayan Temple Photo Viral)

खरं तर, उत्तराखंडमध्ये राहणारी निकिता ११ नोव्हेंबर रोजी आपल्या कुटुंबासोबत त्रियुगीनारायण मंदिरात पोहोचली होती. येथे इगासच्या सणाच्या दिवशी, लग्नाच्या त्या सर्व परंपरा पार पाडत तिने रोहनदीप सिंगशी लग्न केले. सप्तवेदीमध्ये पुजारी गिरीश कुरमंचाली यांनी वधू-वरांच्या सात फेऱ्यांचा विधी पूर्ण केला. साध्या सोहळ्यात पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात वधू निकिताने लाल रंगाची साडी परिधान केली होती.

यानंतर नवविवाहित जोडप्याने त्रियुगीनारायण मंदिरात भगवान विष्णू, शिव-पार्वती आणि बामन देवतांचे पुजारी संजय जामलोकीच्या माध्यमातून विशेष पूजा- अर्चना करून आशीर्वाद घेतले.

मंदिराचे पुजारी आणि रवी गावचे रहिवासी संजय जामलोकी यांनी सांगितले की, विवाह सोहळ्यात वधू-वरांच्या कुटुंबीयांसह केवळ त्यांचे खास नातेवाईकच उपस्थित होते.

यापूर्वी टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक (चंद्रमुखी चौटाला) आणि उत्तराखंडचे उच्च शिक्षण मंत्री डॉ.धन सिंग रावत यांच्यासह अनेकांनी त्रियुगीनारायण मंदिरात लग्नगाठ बांधली होती.

सन २०१८ मध्ये त्रियुगीनारायण मंदिराला राज्य सरकारने वेडिंग डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्याची घोषणा केली होती. मात्र, तीन वर्षांनंतरही येथे मूलभूत सुविधा नाहीत. स्थानिक सामाजिक संस्थांच्या मदतीने येथे १० हून अधिक विवाह झाले आहेत.

निकिता शर्माच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर तिने ‘स्वरागिनी’, ‘दो दिल एक जान’, ‘शक्ती’ आणि ‘फिर लौट आई नागिन’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मेहुणा आयुष शर्माला सलमान खानसोबत ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’मध्ये करायचे नव्हते काम, केला खुलासा

-श्रद्धा आर्याला उचलून घेऊन मंडपात पोहोचला पती राहुल, वधू-वरावर खिळल्या सर्वांच्याच नजरा

-वीर दासच्या वक्तव्यावर भडकली कंगना; थेट दहशतवादाशी तुलना करत, केली कडक कारवाईची मागणी

हे देखील वाचा