‘मिस युनिव्हर्स’ सुष्मिता सेनच्या वहिनीचा बाथटब व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

TV Actress Sushmita Sen Sister In Law Charu Asopa Bathtub Video Goes Viral On Social Media


‘मिस युनिव्हर्स’ किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? असा प्रश्न विचारल्यावर सर्वांच्या मुखात आपसुकच अभिनेत्री सुष्मिता सेनचे नाव येते. तिने हा किताब जिंकत इतिहास रचला होता. तिची गणना बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये होते. सुष्मिताप्रमाणेच तिची वहिनी आणि टीव्ही अभिनेत्री चारु असोपाही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. ती नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. चारुचे लग्न सुष्मिताचा लहान भाऊ म्हणजेच राजीव सेनसोबत झाले आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सध्या तिचा बाथटब व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे.

चारूचा हा व्हिडिओ जबरदस्त चर्चेत आहे. ती सध्या आपला पती राजीवसोबत गोव्यामध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. यादरम्यान तिने आपले व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. यामध्ये बाथटबचाही व्हिडिओ आहे. या व्हिडिओत दिसते की, ती बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवत आहे.

या व्हिडिओत ती एकदम बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडत आहे. त्याचसोबत चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. तसेच चाहते तिची प्रशंसाही करत आहेत.

नुकताच तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आपले बोल्ड फोटो शेअर केले होते. या फोटोत ती लाल रंगाच्या बिकिनीत दिसली होती. बिकिनी घालून ती ग्लॅमरस पोज देत होती. यावेळी ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत होती. ती प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळे पोज देताना दिसते. या फोटोंमध्ये ती आपली फिट बॉडी फ्लॉन्ट करताना दिसतेय. तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लाल रंगाच्या इमोजीचाही समावेश केला होता.

 

चारुने ‘मेरे अंगने में’, ‘अकबर बिरबल’, ‘जीजी मां’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझ टिक टॉकवर? अभिनेत्याला ओळखण्यात चाहत्यांकडून चूक, पाहा व्हायरल व्हिडिओ

-निरहुआ आणि आम्रपालीच्या जोडीची धमाल, व्हिडिओला मिळाले १ कोटी ३४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-बाहुबलीचा बल्लाळदेव दिसणार ‘हाती मेरे साथी’ सिनेमात, चित्रपटाचा जबराट ट्रेलर झाला रिलीझ


Leave A Reply

Your email address will not be published.