Friday, December 8, 2023

‘डायपर ड्रेस…’, उर्फीने टी बॅगपासून ड्रेस बनवल्यानंतर युजर्सने केल्या भन्नाट कमेंट, लगेच वाचा

उर्फी जावेद कायमच तिच्या हटके स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधते. ती कधी सेफ्टी पिनने बनवलेला ड्रेस घालून बाहेर पडते, तर कधी च्युइंगम टॉप घालून फोटोशूट करते. तिचे नाव डोळ्यासमोर येताच ती यावेळी काय नवीन करणार असा विचार नेटकऱ्यांना पडताे. अशातच आता उर्फी पुन्हा एकदा तिच्या अतरंगी स्टाइलसाठी चर्चेत आली आहे, ज्यामुळे युजर्स अभिनेत्रीला चांगलेच ट्राेल करत आहेत.

खरे तर, उर्फी जावेद (uorfi javed) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने टी बॅगपासून वन पीस आउटफिट तयार केला आहे. व्हिडिओमध्ये उर्फी पहिल्यांदा आरामात चहा पिते आणि मग तिची नजर कपात बुडवलेल्या चहाच्या पिशवीवर पडते. तेवढ्यात उर्फी तिचा नवीन ड्रेस घालून समोर येते.

युजर्सने उर्फीला केले ट्राेल
व्हिडिओमध्ये उर्फी तिच्या ड्रेसवर केलेले प्रयोगही दाखवत आहे. उर्फी तिच्या ड्रेसवर पाणी टाकून दाखवते की, कशाप्रकारे तिच्या ड्रेसचा रंग चहाच्या रंगात बदलताे. हा व्हिडिओ शेअर करत उर्फी जावेद कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हॅलो मित्रांनो, चहा घ्या.’ अशात चहाच्या पिशव्यापासून बनवलेला उर्फीचा हा ड्रेस पाहून चाहते पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाले आहेत आणि कमेंट करून तिच्यावर निशाणा साधत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘डायपर ड्रेस बाकी आहे, करून बघा, तुम्हाला आवडेल.’, तर दुसऱ्या एका व्यक्तीने कमेंट करत लिहिले की, ‘उर्फी दीदी काहीही करू शकते.’ याशिवाय एका युजरने म्हटले की, ‘तुम्हाला चहा पाहिजे, तुम्हीच प्या.’

सोशल मीडियावर लोक उर्फीला ट्रोल करत असतानाच अनेक युजर्स तिच्या या ड्रेसचे कौतुकही करत आहेत. कोणी तिला क्रिएटिव्ह म्हणत आहेत, तर कोणी तिला टॅलेंटेड म्हणत आहेत.(tv actress uorfi javed made dress with tea bag netizens trolled on social media abusive comments)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अक्षरा सिंगचे रोमँटिक गाणे ‘अखियां घायल करे’ रिलीज, अभिनेत्रीची स्टाइल पाहून चाहते थक्क

‘अॅनिमल’च्या सेटवरून रणबीर कपूरचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट

हे देखील वाचा