‘बिग बॉस ओटीटी‘च्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेऊन प्रसिद्धीच्या झाेतात आलेली उर्फी जावेद हिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारली आहे. उर्फी ‘मेरी दुर्गा‘, ‘चंद्र नंदनी‘ यांसारख्या दमदार मालिकेत दिसली आहे. उर्फी तिच्या लूकमुळे चर्चेत असून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती दररोज इंस्टाग्रामवर तिच्या क्रिएटिव्ह लूकचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशात अलीकडे उर्फी जावेदने तिचा नवा व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. उर्फीने तिच्या नवीन व्हिडिओमध्ये क्रिएटिव असण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
उर्फी जावेद (urfi javed) हिने तिचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची बहीण आसफी जावेदही दिसत आहे. आसफी तिच्या आईला टिश्यू पेपरबद्दल विचारले. ती म्हणते,”मम्मी सगळे टिश्यू पेपर कुठे गेले? कालच आणले हाेते. यानंतर, अचानक तिला आठवते आणि ती म्हणते, “उर्फी आली का?” यानंतर उर्फी तिच्या नव्या लूकमध्ये दिसते, ज्यात तिने टिश्यू पेपर पासून बनवलेला टू-पीस ड्रेस परिधान केला आहे.
मात्र, हा पोशाख कसाही बनवला असला, तरी तिच्या आधीच्या ड्रेसपेक्षा लाखपट चांगला आहे, ज्यात उर्फी छान दिसत आहे. मात्र, तरीदेखील उर्फीचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला नाही. त्यांनी अभिनेत्रीला पवित्र रमजान महिन्याची आठवण करून दिली आणि प्रचंड संताप व्यक्त केला.
View this post on Instagram
उर्फी जावेदला टिश्यू पेपरमध्ये गुंडाळलेले पाहून एका युजरने लिहिले, ‘आता टॉयलेट पेपरही.’, तर एक युजर म्हणाला, ‘हे सगळ थांबव रमजानचा पवित्र महिना सुरू आहे.’ अशात एका युजरने विचारले, ‘उर्फी जी घालायला अजून काही उरले आहे का?’ अशाप्रकारे युजर्स अभिनेत्रीच्या व्हिडिओवर भिन्नभिन्न कमेंट करून तिला ट्राेल करत आहेत. (tv actress urfi javed made derss with tissue paper netizens slams her says stop it in ramadan month)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘ही तर उर्फीची आई निघाली’ म्हणत नेटकऱ्यांनी केले मलायकाला ‘त्या’ ड्रेसवरून ट्रोल
कपिल शर्माला शोमध्ये ‘हा’ शब्द वापरण्यास केली मनाई; कारण जाणून तुम्ही व्हाल थक्क