Tuesday, July 23, 2024

अरे वाह! दिल्लीत 4 नोव्हेंबरपासून EU चित्रपट महोत्सव, 23 भाषांमध्ये 27 देशांतील चित्रपट पाहण्याची संधी

सिनेप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. दोन वर्षांनंतर भारतात पुन्हा एकदा युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हल होणार आहे. या महोत्सवात युरोपातील 12 पेक्षा अधिक देशांतील 23 भाषांमधील 27 चित्रपट दाखवले जाणार आहेत. हे चित्रपट युरोपातील अनेक देशांतील स्टाेरीचा बाॅक्स तर असेलच, पण दिल्लीत बसून विविध संस्कृती अनुभवण्याची संधीही चित्रपट रसिकांना मिळणार आहे. EU चित्रपट महोत्सव 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तर 13 नोव्हेंबरला संपणार आहे.

EU चित्रपट महाेत्सवात ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, झेकिया, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लाटविया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड, पोलंड, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हाकिया,  स्पेन, स्वीडन आणि पोर्तुगालमधील चित्रपट दाखवले जातील. या महोत्सवात विविध देशांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट तसेच पुरस्कार विजेते चित्रपटही दाखविण्यात येणार आहेत.

या फेस्टिवलचे आयाेजन भारतातील युराेपियन संघाचे प्रतिनिधिमंडल, EUच्या सदस्य देशांच्या दूतावासांद्वारे केल्या जाईल. 2022 हे वर्ष युरोपियन युनियन आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंधांना 60 वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे EU फिल्म फेस्ट हा प्रसंग संस्मरणीय ठरेल, अशी आशा आयोजकांना आहे. भारतातील युरोपियन युनियनचे राजदूत युगो अस्तुटो म्हणाले, “भारतात EU चित्रपट महोत्सवाची 27 वी आवृत्ती सुरू झाल्याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. दोन वर्षांनी हा कार्यक्रम होत आहे. EU फेस्टिव्हलमध्ये कॉमेडी, ऍक्शन, ड्रामा आणि ऍनिमेशन अशा विविध शैलीतील चित्रपट दाखवले जातील.

माध्यमांतील वृत्तांनुसार, युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हल नवी दिल्ली येथे तीन ठिकाणी हाेणार आहे. हा फेस्टिव्हल इंडिया हॅबिटॅट सेंटर, इन्स्टिट्यूटो सर्व्हंटेस आणि इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित केला जाईल. हा संपूर्ण कार्यक्रम 4 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत चालणार आहे. EU चित्रपट महोत्सवानंतर, एक वर्चुअल फिल्म फेस्टिवल देखील आयोजित केला जाईल, जे 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत चालेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
दीपिका जिममध्ये कसा गाळते घाम? कॅटरिना कॅफने व्हिडिओ शेअर करत केला खुलासा

अर्रर्र! सलमान खान शोमध्ये परतताच उडाली खळबळ, सुंबुल तौकीरवर चागंलाच संतापला अभिनेता

हे देखील वाचा