झिंग झिंग झिंगाट! मलायका अरोराने केला शानदार धुनुची डान्स, सोबत अनुराग बासूनेही धरला ठेका; व्हिडिओ जोरदार व्हायरल


‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ हा डान्स रियॅलिटी शो सुरू झाला आहे. या शोच्या शूटिंग सेटवरून एक व्हिडिओ समोर आला आहे, जो धम्माल उडवून देत आहे. अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोराची घायाळ करणारी अदा पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये दिसली आहे. शोच्या आगामी एपिसोडमध्ये अनुराग बासू मलायका अरोरासमवेत धुराची धुनुचीवर डान्स करताना दिसत आहेत. याची एक झलक सोशल मीडियावर, शेअर करण्यात आली जी व्हायरल होऊ लागली आहे.

व्हिडिओमध्ये मलायका अरोरा चदेरी रंगाची सिमी साडी परिधान करून, धुनुची डान्समध्ये कमालीची दिसत आहे. अनुराग बासूदेखील हिरव्या रंगाचा कुर्ता, आणि सोनेरी रंगाच्या धोतीमध्ये मलायकासोबत डान्स करताना दिसत आहेत. अनुराग आणि मलायका दुर्गापूजनाच्या विशेष प्रसंगी, पारंपारिक नृत्य सादर करत आहेत. दोघेही हातात धूर घेऊन आश्चर्यकारक कामगिरी करत आहेत.

व्हिडिओमध्ये या दोघांचा डान्स पाहून शोमध्ये पोहोचलेल्या सुप्रिया पिळगावकर आणि सचिन पिळगावकर जोरदार कौतुक करताना दिसत आहेत. दोघांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, चाहते या दोघांचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. या शनिवार व रविवारच्या शोमध्ये सुप्रिया पिळगावकर आणि सचिन पिळगावकर पाहुणे म्हणून दिसणार आहेत. या शनिवार व रविवारची थीम लोक- संगीताचे मिश्रण आहे. या थीमवर सर्व स्पर्धक, आपली नृत्य कला सादर करताना दिसतील.

या शोमध्ये बॉलिवूड नृत्यदिग्दर्शक गीता कपूर, मलायका अरोरा, अनुराग बासू परीक्षकांची भूमिका साकारत आहेत. या शोदरम्यान डान्सर- मॉडेल मलायका तिची चमक दाखवताना दिसणार आहे. यादरम्यान मलायका स्पर्धकांना अधून- मधून आपले किस्से आणि आपला घायाळ करणारा डान्स दाखवणार आहे. या भागात मलायकाला पाहिल्यानंतर ती आपल्या वयावर मात करताना दिसली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मलायका बर्‍याचदा तिचे फिटनेस सिक्रेट्स, सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओंद्वारे शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवीन संगीतकार जोडी श्रोत्यांच्या भेटीला! ‘या’ फेसबुक पेजवरून गुरुवारी जाणार लाईव्ह, पाहा कसा सुरू झाला श्रेयसी अन् शौनक यांचा प्रवास

-‘काळ्या चिमण्या दिसंना झाल्यात, आवरा राव थोडंसं’, शालूचा डान्स पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट

-पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खानसोबत लग्नबंधनात अडकणार होती रेखा, अभिनेत्रीची आई कुंडली घेऊन थेट पोहोचली होती ज्योतिषीकडे


Leave A Reply

Your email address will not be published.