Tuesday, May 21, 2024

अर्रर्र! बिग बाॅसच्या घरात माेठा बदल, ‘हा’ अभिनेता करणार वाइल्ड कार्ड एन्ट्री

टीव्हीचा सर्वात वादग्रस्त आणि लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस 16‘ सुरुवातीपासूनच टीआरपीच्या शर्यतीत टॉप 10 मध्ये राहिला आहे. यावेळी बहुतेक ते स्पर्धक घेतले गेले आहेत जे टीव्ही कलाकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे निमृत कौर अहलुवालिया जी बिग बॉसच्या घराची पहिली कॅप्टन होती. अलीकडे, अब्दूसोबतची तिची क्यूट बाँडिंग खूप चर्चेत होती. त्यानंतर शोमधील त्यांचे वाद सतत चर्चेत असतात. दरम्यान, बिग बॉसमध्ये निमृतच्या एका खास मित्राची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची बातमी समाेर येत आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, निमृत कौर (Nimrit Kaur ) हिचा रयूमर्ड बॉयफ्रेंड माहिर पांधी (Mahir Pandhir) शोमध्ये प्रवेश करणार आहे. याबाबत अधिकृत माहिती आली नसली तरी, त्यांच्या आगमनाची चर्चा जोरात सुरू आहे. वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन निमृतला सपोर्ट करण्यासाठी माहिर सलमान खान (Salman Khan) याच्या शोमध्ये येऊ शकते, असे मानले जात आहे. माहिर निमृतचा को-स्टार आहे. दोघांनी टीव्ही मालिका ‘छोटी सरदारनी’मध्ये एकत्र काम केले होते.

माहिर बिग बॉसमध्ये प्रवेश करत असल्याच्या बातम्यांदरम्यान चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या निर्णयामुळे काही चाहते खूश आहेत, तर काहींनी अब्दूबद्दल खंत व्यक्त केली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “माहिर एक चांगला माणूस असल्याने त्याने बिग बॉसमध्ये येऊ नये.”

एका चाहत्याने सांगितले की, “बिग बॉसच्या घरात निमृतला खूप पाठिंबा मिळतोय, ती एका ग्रुपचा भाग आहे आणि प्रत्येक वेळी स्व:ताचे चांगले संरक्षण करते. आता जर तिचा मित्र आला तर, तो तिला सांगेल की, लोक त्याच्या खेळाबद्दल काय विचार करतात आणि मग तिला बुली गॅंगला मिळत असलेल्या फायद्यावर आणखी एक फायदा होईल.”

अशात निमृत कौरचा रयूमर्ड बॉयफ्रेंड माहिर पांधी खराेखरच सलमानच्या शाेमध्ये येताे का? हे बघण्यासाठी चाहते उत्सूक आहेत. (tv nimrit kaur ahluwalia close friend mahir pandhir wild card entry in salman khan show bigg boss 16)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा
फॅन असावी तर अशी शहनाजला भेटण्यासाठी चाहतीने केले सात समुद्र पार, पाहा भन्नाट व्हिडिओ
वेस्टर्न कपडे परिधान करणाऱ्या भारतीय महिलांवर जया बच्चन यांनी उपस्थित केले प्रश्न, वाचा संपूर्ण बातमी

हे देखील वाचा