Saturday, April 20, 2024

अय्याे! गाैतम असा काय वागला की, साैंदर्या शर्मा रडली ढसाढसा

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘च्या ‘फ्रायडे का वार’ एपिसोडमध्ये सलमान खान याने शुक्रवारी (दि. 4 नाेव्हेंबर)ला सौंदर्या शर्मा हिला शाकाहारी जेवणासाठी आणि शालीन भानोत याला चिकनसाठी फटकारले. यानंतर त्यांनी घरातील सदस्याना गैरसमज दूर करण्यास सांगितले. घरातील अनेक सदस्यानी सौंदर्या आणि गौतम विजचे नाते फेक असल्याचे सांगितले, या टास्कदरम्यानही त्यांचे नाते फेक असल्याचे स्पर्धक बाेलले. 

आता निर्मात्यांनी ‘बिग बॉस 16’ (bigg boss 16) च्या आगामी भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे, जो कदाचित ‘शनिवार का वार’ मध्ये दाखवला जाईल. या प्रोमोमध्ये सलमान खान (salman khan) सौंदर्या शर्माला (soundrya sharma) एक व्हिडीओ दाखवतो, जो पाहून ती खूप तुटून जाते आणि गौतम (gautam wig) साेबत बोलत असताना ती ढसाढसा रडू लागते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

सलमान खान सौंदर्याला काहीतरी दाखवायला सांगत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर एक व्हिडिओ क्लिप आली आहे, ज्यामध्ये शालीना भानोत आणि निमृत कौर अहलुवालिया सौंदर्याची खिल्ली उडवतात, तर गौतम विज तिच्यासाेबत साेफ्यावर बसताे आणि हसू लागताे. क्लिपचा शेवटी सलमान सौंदर्याला सांगताे की, “ज्याचा तू बचाव करत होतीस त्यांनी तुझ्यासाठी काहीही केले नाही.”

सौंदर्या शर्मा आणि गौतम विग यांनी बिग बाॅसच्या घरामध्ये आपले प्रेम व्यक्त केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर सौंदर्या आणि गौतम विज यांच्यात भांडण होत आहे. सौंदर्या म्हणते, “ते तुमच्यासमोर चेष्टा करत होते.” गौतम म्हणतो, “मी काही बोललो नाही.” त्यानंतर सौंदर्या रागाने प्रतिक्रिया देते आणि म्हणते, “तुला उत्तर द्यायचे होते गौतम…माझे वडील असते तर एक चापट मारली असती.” बोलता बोलता सौंदर्या शर्माचे अश्रू अणावर झाले आणि ती पुढे म्हणाली, “किमान तू माझा आदर राखला असतास गौतम.. प्लीज निघून जा.” असे म्हणताच ती डोके खाली करून जोरजोरात रडू लागली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विराट कोहली जेव्हा अनुष्का शर्मासाठी सार्वजनिक ठिकाणी पोहोचला होता बेकरीत, तेव्हा घडलं असं काही

ऐश्वर्या रायने केले प्रेरित, तर सलमान खानने दिला चित्रपटात ब्रेक; जाणून घेऊया अथिया शेट्टीबाबत काही खास गोष्टी

हे देखील वाचा