Sunday, April 14, 2024

‘रात्रीस खेळ चाले’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याने केलं दुसऱ्यांदा लग्न, व्हिडीओ होतोय व्हायरल

मराठी मनोरंजन विश्वातील अशा अनेक मालिका आहेत. ज्या बंद होऊन ही कित्येक दिवस उलटून गेली आहे. त्यातलीच एक म्हणजे झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले‘ ही आहे. या मालिकेने कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात एक विषेश स्थान निर्मान केले आहे. त्यातील काही कलाकार आजही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनतात. त्या मालिकेत दत्ताची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे सुहास शिरसाट होय. सुहास सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

सुहास ( Suhas Shirsat) त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सुहास सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. सध्या सुहासचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ सुहासच्या लग्नाचा आहे. आता तुम्ही म्हणाल हे कस शक्य आहे. तर तुम्ही ऐकत आहात हे खर आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

सुहासने पत्नी स्नेहा माजगावक सोबत पुन्हा लग्न केले आहे. स्नेहा एक उत्तम अभिनेत्री आहे. सुहास आणि स्नेहाचा 9 जूनला लग्नाचा वाढदिवस होता. त्याच दिवशी त्या दोघांनी पुन्हा एकदा लग्न केल आहे. सुहास आणि स्नेहाच्या लग्नाला दहा वर्ष पुर्ण झाली आहेत. याचनिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी तसेच मित्र परिवाराने त्यांच्यासाठी खास सरप्राइजचं दिले आहे. यावेळी सुहास व त्याच्या पत्नीने अगदी जोरदार धमाल-मस्ती करताना दिसत आहेत.

यादरम्यान, स्नेहाने एक पोस्ट शेअर केली आहे, तिने पोस्ट करताना लिहीले की, “लग्नाच्या १० वर्षा नंतर पुन्हा त्याच दिवशी आम्हाला गोड माणसानकडून एक गोड सरप्राइज मिळाल आहे. त्यांनी आमच पुन्हा लग्नलावून दिलं आहे. हे दोन दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ९ जूनला आमच्या लग्नातचा वाढदिवस असतो. तर १० जूनला सुहासचा वाढदिवस असतो. या सर्व माणसांमुळे हे दिवस खूप आनंदाचे गेले.” तिच्या या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहेत. (tv serial ratris khel chale Marathi actor suhas shirsat again married with wife on wedding anniversary watch video)

अधिक वाचाः
27 वर्षीनी लहान अभिनेत्रीसाेबत नवाजुद्दीनने केले लीप-लॉक किसिंग; नेटकऱ्यांचा संताप अनावर

शाहरुख खानला महिला चाहतीने जबरदस्तीने केले किस; काय म्हणाले युजर वाचा एकदा 

हे देखील वाचा