Saturday, June 29, 2024

नोरा फतेही डेटला कधीच भरत नाही बिल; पाहा अर्चनाच्या प्रश्नावर काय म्हणाली अभिनेत्री

छाेट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा शो‘ बर्याच दिवसांपासून लाेकांचे मनाेरंजन करत आहे. आतापर्यंत, या शोमध्ये मनोरंजन, राजकारण, क्रीडा, सिनेमा यासारख्या विविध क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. अशात आता, प्रेक्षक शोच्या आगामी एपिसाेडसाठी खूप उत्सुक आहेत. कारण, आगामी एपिसाेडमध्ये बॉलीवूडचे सुपरस्टार अक्षय कुमार, सोमन बाजवा, नोरा फतेही, मौनी रॉय आणि दिशा पटानी या शोची शोभा वाढवताना दिसणार आहेत, ज्याचा प्राेमाे साेशल मीडियावर वेगाने व्हायरल हाेत आहे.

सोनी टीव्हीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ‘द कपिल शर्मा शो’चा नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये आगामी भागाची झलक दिसत आहे. या प्रोमोमध्ये कपिल अर्चना पूरण सिंगला सांगतो की, “तुम्हाला माहित आहे का अर्चना जी नोराने नुकतेच मीडियामध्ये एक स्टेटमेंट दिले आहे की, ‘जर मुलगा आणि मुलगी एकत्र डेटवर गेले, तर त्या डेटचे जे काही बिल येईल ते मुलाने भरावे’.” यानंतर अर्चना नोराला सांगते, “जग बदलले आहे. आता महिलाही पैसे देतात.” यावर नोरा उत्तर देते, “तुम्ही करू शकता पण मी नाही.”

प्रेक्षकांच्या आवडत्या शोमध्ये सिद्धार्थ सागरसह, कपिल शर्मा, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, अर्चना पूरण सिंग, सृष्टी रोडे, गौरव दुबे, इश्तियाक खान आणि श्रीकांत जी मस्की हे कलाकार आहेत. या व्यतिरिक्त अर्चना पूरण सिंग गेस्टच्या भूमिकेत आहे जे टिमच्या सहकाऱ्यांप्रमाणेच एंटरटेनिंग आहे. द कपिल शर्मा शोचा प्रीमियर 10 सप्टेंबर रोजी आला असून हा शाे प्रत्येक शनिवार आणि रविवारी रात्री 9:30 वाजता सोनी टीव्हीवर प्रसारित होईल.(tv show kapil sharma promo nora fatehi never pay bills on date see her response to archana puran singh)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राखी सावंत तिसऱ्यांदा अडकणार ‘या’ कलाकारासाेबत लग्न बंधनात?, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

राज कपूरसाेबतच्या अफेअरवर झीनत अमानने ताेडले माैन; म्हणाल्या, ‘देव आनंदला असं वाटलं…’

हे देखील वाचा