कॅनडावरून आलेली नोरा फतेही एका आयटम साँगसाठी घेते मॉडेलपेक्षाही अधिक मानधन; वर्षाला कमावते ‘इतके’ कोटी


आजच्या काळात बॉलिवूड हे फक्त भारतीयांसाठीच मर्यादित न राहता अनेक परदेशी कलाकारांनी देखील या इंडस्ट्रीमध्ये येऊन त्यांच्या कलेच्या आणि प्रतिभेच्या जोरावर स्वतःला सिद्ध केले आहे. अशीच एक अभिनेत्री, डान्सर म्हणजे नोरा फतेही.

सध्याच्या काळात बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये तिचे नाव कमावले आहे. नोरा तिच्या आयटम साँग्समुळे खूप प्रसिद्ध आहे. नोराचा डान्स आणि तिचे अदा सर्वानाच घायाळ करतात. मूळची कॅनडाची असलेल्या नोराने भारतात तिच्या प्रतिभेच्या जोरावर नावलौकिक प्राप्त केला आहे.

हार्डी संधूच्या ‘क्या बात है’ या गाण्यातून नोराने इंडस्ट्रीमध्ये जोरदार यशस्वी एन्ट्री घेतली. तिचे हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर ती टी-सीरिजच्या अनेक गाण्यांमध्ये दिसून आली. नोराने तिच्या डान्सच्या जोरावर अनेक पुरस्कारांवर नाव कोरले. नोराने तिच्या डान्सच्या जोरावर भरपूर पैसा कमावला आहे. तिची संपत्ती कोटींमध्ये आहे.

फिल्मिसियप्पा डॉट कॉमच्या एका बातमीनुसार नोरा फतेही एका गाण्यासाठी ४० लाख रुपये घेते. तिचे हे मानधन बॉलिवूड आणि पंजाब इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एखाद्या मॉडेलपेक्षाही जास्त आहे. जेव्हा नोराचे ‘गर्मी’ गाणे सोशल मीडियावर तुफान गाजले. त्यानंतर तिने तिची फी वाढवली आहे.

नोरा सोशल मीडियावर ब्रँड्सच्या प्रमोशनसाठी ५ लाख रुपये चार्ज करते. खूपच कमी काळात नोराने हिंदी सिनेसृष्टीतील वरुण धवन, श्रद्धा कपूर, नेहा कक्कर, जॉन अब्राहम आदी अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे.

नोरा आज सिनेसृष्टीतील सर्वात जास्त मागणी असलेली अभिनेत्री आहे. नोराच्या नेटवर्थबद्दल सांगायचे झाले, तर तिची १.५ मिलियन डॉलरची संपत्ती आहे. भारतीय रुपयांमध्ये सांगायचे झाले, तर तिची संपत्ती १२ कोटी रुपये इतकी आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे सतत चर्चेत राहणारी नोरा वर्षाला २ कोटी रुपये कमावते. लवकरच नोरा चित्रपटात अभिनय करताना देखील दिसणार आहे.

नोराने हिंदीसोबतच कन्नड आणि तेलुगु चित्रपटांमध्येही देखील काम केले आहे. सुरुवातीच्या काळात अनेक अपयश पचवणाऱ्या नोराने चिकाटी न सोडता प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि एवढे यश मिळवले. नोराच्या कुटुंबात तिचे आई- वडील आणि एक भाऊ आहे. आपल्या आयटम साँग्समुळे तिने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. ज्यामुळे ती आज खूप लोकप्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हनीमूनवर असताना संजयने लावली होती करिश्माची बोली, खुद्द अभिनेत्रीने केला होता घटस्फोटाच्या चार वर्षानंतर खुलासा

-‘तिरंगा’ चित्रपटासाठी नानांनी दिला होता नकार; मात्र नंतर ‘ही’ विचित्र अट सांगत भरली त्यांनी हामी

-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद


Leave A Reply

Your email address will not be published.