Wednesday, February 5, 2025
Home बॉलीवूड २०२५ मध्ये बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घालायला येत आहेत हे मोठे चित्रपट; सलमानचं पुनरागमन होणार का…

२०२५ मध्ये बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घालायला येत आहेत हे मोठे चित्रपट; सलमानचं पुनरागमन होणार का…

2024 हे वर्ष संपणार आहे, या वर्षी सिनेप्रेमींसाठी अनेक धमाकेदार चित्रपट आले आहेत. याशिवाय पुढील वर्षाची तयारीही सुरू झाली आहे. पुढच्या वर्षी येणाऱ्या चित्रपटांबद्दल सांगूया…

वॉर 2 – हृतिक रोशन

अभिनेता हृतिक रोशनच्या ‘क्रिश’ या चित्रपटाच्या पुढील भागाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. याशिवाय चाहत्यांना ‘वॉर 2’चा पुढचा भाग पुढील वर्षी पाहायला मिळणार आहे. हा अयान मुखर्जीचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे.

सिकंदर – सलमान खान, रश्मिका मंदान्ना आणि काजल अग्रवाल

सिकंदर या चित्रपटात सलमान खान दुहेरी भूमिकेत दिसणार असून, रश्मिका मंदान्ना आणि काजल अग्रवाल यात दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी ईद 2025 ला प्रदर्शित होणार आहे.

अल्फा – आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ

त्याचबरोबर अल्फा हा चित्रपटही चाहत्यांसाठी मनोरंजनाचा एक डोस घेऊन येणार आहे. यात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ दिसणार आहेत.

जॉली एलएलबी 3 – अर्शद वारसी-अक्षय कुमार

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा जॉली एलएलबी 3 हा चित्रपटही चाहत्यांसाठी मनोरंजनाचा धमाका असणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर या चित्रपटात हुमा करीशी आणि अमृता राव दिसणार आहेत.

सितारे जमीन पर – आमीर खान- जिनिलीया डिसुझा  

आमीर खान त्याच्या २००७ साली आलेल्या सुपरहिट तारे जमीन पर या सिनेमाचा सिक्वेल घेऊन येत आहे. या सिनेमाचं नाव सितारे जमीन पर असं ठेवण्यात आलं आहे. या चित्रपटात आमीर सोबतच अभिनेत्री जिनिलीया डिसुझा  असणार आहे. या चित्रपटाची कथा अपंग मुले फुटबॉल खेळतात या भोवती फिरणार आहे. आर एस प्रसन्ना यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

या घटनांनी गाजवले २०२४ चे वर्ष; तिन्ही खानांचे मिलन तर लापता लेडीजची ऑस्करवारी…

author avatar
Sankalp P

हे देखील वाचा