Tuesday, June 18, 2024

डोळ्याखाली डार्क सर्कल्स, तर चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स! विना मेकअप ‘अशी’ दिसते उर्फी जावेद

‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर पडल्यापासून उर्फी जावेद सतत लाईमलाईटमध्ये असते. तिचा एअरपोर्ट लूक असो किंवा जिम लूक, आपल्या फॅशनने सर्वांचे लक्ष वेधण्याची एकही संधी ती सोडत नाही. महत्वाचे म्हणजे, उर्फी तिच्या विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिचे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात. पॅपराजीसाठी पोझ देताना उर्फी खूप ग्लॅमरस आणि सिझलिंग दिसत असते. परंतु आता तिचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती मेकअप विना दिसत आहे.

विना मेकअप दिसते ‘अशी’
उर्फीने हा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला असून, यात तिचे दोन लूक पाहायला मिळत आहेत. पहिल्या लूकमध्ये उर्फी मेकअपशिवाय आहे, ज्यामध्ये ती पूर्णपणे वेगळी दिसत आहे. तिच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स आहेत आणि चेहरा तेलकट आहे. दुसऱ्या लूकमध्ये ती पूर्णपणे मेकअप करून स्टायलिश लूकमध्ये पोझदेत आहे. दुसऱ्या लूकमध्ये तिने लाल रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे. ज्यात ती बऱ्यापैकी सुंदर दिसत आहे. (urfi javed no makeup look shares video her face different difficult to recognize)

शेअर केला व्हिडिओ
व्हिडिओ पोस्ट करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुम्हाला तयार व्हायला किती वेळ लागतो?” या व्हिडिओवर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर आतापर्यंत १५ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे.

उर्फीचे करिअर
उर्फी जावेदने सोनी टीव्हीवरील शो ‘बडे भैया की दुल्हनिया’मधून करिअरला सुरुवात केली होती. यात तिने अवनी पंतची भूमिका साकारली होती. यानंतर तिने स्टार प्लसच्या ‘चंद्र नंदनी’ या शोमध्ये छाया ही व्यक्तिरेखा साकारली. उर्फीच्या मालिकांच्या यादीत ‘सात फेरो की हेरा फेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’, ‘डायन’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी की’चा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा