Friday, April 19, 2024

नोरा फतेहीलाही टक्कर देतेय उर्फी जावेद! डान्स मुव्ह्ज पाहून तुम्हीही व्हाल दंग

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री उर्फी जावेद ही सतत चर्चेत राहणारं व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या बोल्डनेसमुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. अशातच उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्री तिच्या टोन्ड फिगरला फ्लॉन्ट करत, डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद एखाद्या प्रोफेशनल डान्सर सारखे ठुमके लावत आहे. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांनाही आवडत आहे.

https://www.instagram.com/reel/CVHqC0hISTY/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री तिच्या बोल्ड लूक आणि रिवलिंग आऊटफिटमुळे अनेकदा चर्चेत येते. अलीकडेच, ऑफ शोल्डर ड्रेसमधील तिचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. शिवाय अभिनेत्री विमानतळावर अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसते. तिने कधी प्लास्टिकच्या पिशव्यांनी बनलेली तर कधी मोजेने बनवलेली बिकिनी घालून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (urfi javed video doing belly dance going viral over social media flaunts curvy looks)

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर उर्फी जावेद अखेरची रियॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसली होती. या शोमध्ये तिची दमदार एन्ट्री झाली, मात्र ती या शोमध्ये जास्त काळ टिकू शकली नाही. ती खूपच कमी वेळात बेघर झाली होती.

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत राहते. उर्फी जावेद ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांना पाहून पॅपराजीची गर्दी होते. महत्वाचे म्हणजे, ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यापासून तिने आतापर्यंत कोणत्याही नवीन प्रकल्पाची घोषणा केलेली नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बोल्ड लूकने आग लावणाऱ्या उर्फीने, अभिनेत्री होण्यापूर्वी केलंय ‘हेही’ काम, वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

-‘पब्लिसिटीसाठी ही नग्नदेखील होईल’, उर्फी जावेदचा बोल्ड लूक पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

-जीन्ससोबत उर्फीने फक्त ब्रालेट केली परिधान, बोल्ड फोटोत दिसलं असं काही की, नेटकरी म्हणाले…

हे देखील वाचा