मराठीत चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि डान्सर उर्मिला कोठारे ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. लहानपणापासून उर्मिलाला डान्सची प्रचंड आवड आहे. मोठी झाल्यावरही तिने डान्ससोबत अभिनयाचे करिअर निवडले. ती तिचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अवघ्या काही कालावधीतच तिच्या या डान्स व्हिडिओला प्रसिद्धी देखील मिळते. अनेकवेळा ती तिच्या मुलीला देखील डान्स शिकवताना दिसते. अशातच उर्मिलाच एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे.
उर्मिलाने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्मिला एरियल डान्सची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘जुगनू’ हे गाणे लागले आहे. या व्हिडिओमध्ये ती वेगवेगळ्या डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. (Urmila kothare share her dance video viral on social media)
हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “तेरे प्यार में चमकू जैसे जुगनू.” तिच्या चाहत्यांना तिचा हा डान्स व्हिडिओ खूपच आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. उर्मिला नेहमीच तिचे डान्स व्हिडिओ शेअर करत असते. परंतु तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना खास आवडला आहे. तिच्या या व्हिडिओला ४० हजारापेक्षाही जास्त व्ह्यूज आले आहेत.
अभिनेत्री उर्मिला कोठारेने अनेक मराठी चित्रपटात तसेच हिंदी मालिकामध्ये देखील काम केले आहे. तिने मराठीमध्ये ‘दुनियादारी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’, ‘गुरू’, ‘काकण’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘मायका’ आणि ‘मेरा ससुराल’ या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. उर्मिलाचे लग्न मराठीत चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते आणि अभिनेते महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे याच्यासोबत झाले आहे. आदिनाथ देखील एक कमालीचा अभिनेता आहे. उर्मिला आणि आदिनाथने ‘दुभंग’, ‘अनवट’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कार्तिक आर्यनने ‘दोस्ताना २’बद्दल सोडले मौन, चित्रपटातून बाहेर काढण्याबद्दल केले मोठे वक्तव्य
-चहुबाजूंनी विरोध होत असताना, कोमेडियन वीर दासच्या समर्थनार्थ आली काम्या पंजाबी; म्हणाली…