‘रंगीला’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील दाखवला होता. ‘रंगीला’ हा एक असा चित्रपट आहे, ज्याने प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. या चित्रपटाच्या कहाणीपासून ते पात्रांपर्यंत प्रत्येक गोष्ट एकदम छान होती. या चित्रपटात अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हे मुख्य भूमिकेत होते. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने आता हे कबूल केले आहे की, या चित्रपटातील आमिर खानचा अभिनय तिला एवढा आवडला होता की, तिने त्याला एक फॅन लेटर देखील लिहिले होते.
तिने सांगितले की, “जेव्हा मी ‘रंगीला’ या चित्रपटासाठी डबिंग करत होते, तेव्हा मी आमिर खानचा परफॉर्मन्स पाहिला आणि एकदम दंग झाले. मी त्याला एक पत्र लिहिले होते. ज्यामध्ये मी लिहिले होते की, ‘या परफॉर्मन्सनंतर तुला अनेक पात्र मिळतील, अनेक अवॉर्ड मिळतील, पण हे तुला मिळालेलं पहिलं पत्र असेल.'”( Urmila Matondkar became a fan of aamir khan after watching rangeela wrote such a letter for him)
‘रंगीला’ हा चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. या रोमँटिक चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा हे होते. या चित्रपटात आमिर खान, उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ हे कलाकार होते. तिन्ही कलाकारांचा या चित्रपटातील अभिनय नावजण्याजोगा होता. त्यामुळेच त्यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील सुपरहिट ठरला होता. असे म्हटले जाते की, 2004 मध्ये आलेला ‘विन ए डेट विथ टॅड हॅमिल्टन’ हा चित्रपट ‘रंगीला’पासून प्रेरित होऊन बनवला होता.
उर्मिला मातोंडकर आणि आमिर खान हे दोघेही प्रसिद्ध कलाकार आहे. उर्मिलाने मराठीसोबत अनेक हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. आमिर खानने देखील एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तो त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
राखीच्या आयुष्यात पुन्हा आले वादळ, पती आदिल दुर्राणीवर केला गंभीर आरोप; म्हणाली, ‘मला श्रद्धा …’
लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुखचा नाशिक-मुंबई हायवेवर अपघात, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती










