Saturday, January 28, 2023

‘बिग बॉस’ विजेती अभिनेत्री अब्दूवर संतापली, ट्वीटमधून व्यक्त केली नाराजी

अब्दु रोजिक हा ‘बिग बॉस 16‘ चा एक स्पर्धक आहे जो सर्वांचा आवडता आहे. ताजिक गायक होऊनही त्याला देशातील लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. त्याचा खेळ लोकांनाही आवडतो. खुद्द सलमान खानलाही अब्दु आणि त्याचा खेळ खूप आवडतो. अब्दु याची भारतातील लोकप्रियता यावरूनच लक्षात येते की, स्पर्धक आणि प्रेक्षकांसोबतच चित्रपट कलाकारही त्याला पसंत करू लागले आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अब्दुच्या प्रतिक्रिया पाहून छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केली आहे. तिने आपल्या ट्विटद्वारे बिग बॉसच्या निर्मात्यांना लक्ष्य केले आहे. ती अभिनेत्री दुसरी कोणी नसून ‘बिग बॉस 6’ ची विजेती उर्वशी ढोलकिया आहे.

कोमोलिकाच्या भूमिकेतून घराघरात नावाजलेली उर्वशी ढोलकिया (urvashi dholakia) नुकतीच अब्दु रोजिक (abdu rozik ) याच्यावर संतापली. तिने बिग बॉसच्या निर्मात्यांना पक्षपाती म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये तिने लिहिले, “गेल्या शोमध्ये असे दिसून आले की, अब्दूने टास्क करण्यास नकार दिला आणि संपूर्ण गेम अंकितवर पालटला कारण, त्याने गेम सोडला. कस काय? बिग बॉस तुझी तब्येत ठीक नाही का?? कृपया स्वतःला तपासा! काय कचरा आहे.” यासोबत तिने कलर्सलाही टॅग केले आहे.

मागच्या एपिसोडमध्ये कॅप्टेंसीसाठी एक टास्क घेण्यात आला होता, ज्यामध्ये अंकित गुप्ता खोपडीत बसलेल्या अब्दू रोजिकला टास्क देत होता, पण अब्दू आणि साजिद खान वारंवार नकार देत होते. इतकंच नाही तर टास्क दरम्यान अनेक वेळा बोलल्यानंतर अंकित चांगलाच चिडला आणि रागाच्या भरात टास्क करण्यास नकार दिला. यानंतर बराच गाेंधळ झाला हाेता आणि सर्वांनी साजिद खानला अनफेयर म्हटले.

उर्वशी ढोलकिया तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती बिग बॉसला फॉलो करत असून तिने वेळोवेळी स्पर्धकांबाबत तिचे मत मांडले आहे.(urvashi dholakia tweeted against bigg boss 16 contestant abdu rozik got angry and raised questions on the contestant)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुखी संसाराची 13 वर्षे! शिल्पा अन् राजने साजरा केला लग्नाचा वाढदिवस, व्हिडिओतून सांगितला सुंदर प्रवास

इशिता दत्ताच्या सिंपल लुकने केले घायाळ, फोटो गॅलरी फक्त तुमच्यासठी

हे देखील वाचा