Monday, July 1, 2024

जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

आपले आवडते कलाकार आपण जेव्हा बघतो तेव्हा त्यांच्याबद्दल, त्यांच्या सौंदर्याबद्दल, आपल्याला खूपच हेवा वाटतो. अभिनेत्रींचा कमनीय बांधा आणि अभिनेत्यांची बॉडी पाहून भलेभले त्यांच्या प्रेमात पडतात. मात्र त्यांच्या या उत्तम शरीरामागे कलाकार खूप मेहनत घेतात आणि त्याच मेहनतीचे फळ म्हणजे कलाकारांचे आकर्षक शरीर. कलाकार त्यांचे हे शरीर कमवण्यासाठी जिममध्ये खूप मेहनत घेतात. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

अभिनेत्री उर्वशी रौतेला हो तिच्या मादक डान्स मूव्स आणि तिच्या बोल्ड ऍंड स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. ती अतिशय फिट अभिनेत्रींमध्ये अग्रस्थानी असते. उर्वशी रौतेलाचा देखील असाच एक जिममधला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी रफ अँड टफ वर्कआऊट करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी चमकणारी उंच लेगिंन त्यावर हिरवा टॅंक टॉप घातला असून पायात काळे शूज घातले आहे. या एथलेटिक लूकमध्ये उर्वशी बँडेड स्क्वैट्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने बँडेड स्क्वैट्सचे महत्व देखील सांगितले आहे. आगामी काळात ती एका ऍक्शन सिनेमात दिसणार आहे. या सिनेमासाठी ती जिममध्ये खूप जास्त घाम गाळत आहे. (urvashi rautela gym workout video)

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर ती जियो स्टूडियोजच्या ‘इंस्पेक्टर अविनाश’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. यात ती रणदीप हुड्डासोबत मुख्य भूमिका साकारत आहे. शिवाय ती ‘ब्लॅक रोझ’ आणि ‘थिरुट्टू पायले २’च्या हिंदी रिमेक मध्ये दिसणार आहे. नुकतीच उर्वशी गुरु रंधावासोबत त्याच्या ‘डूब गये’ या गाण्यात दिसली होती. या गाण्याला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला.

इंडस्ट्रीमध्ये कोणताही पाठिंबा न मिळवता केवळ प्रतिभेच्या आणि मेहनतीच्या जोरावर उर्वशीने तिचे स्थान इथे निर्माण केले आहे. उर्वशीचे नाव मॉडेलिंग क्षेत्रातही खूप मोठे आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मेहंदी लगा के रखना’ गाण्याचं इंग्लिश व्हर्जन ऐकून प्रियांका चोप्रा झाली लोटपोट! तुम्ही ऐकलं का?

-‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे!’, शालूच्या फोटोने पुन्हा उडवली चाहत्यांची झोप

-पारदर्शी साडीतील ‘तो’ सीन अन् दाऊदसोबतचे नाते, जाणून घ्या मंदाकिनीबद्दल ‘या’ गोष्टी

हे देखील वाचा