Tuesday, July 9, 2024

अंगावर शहारे आणणारा संजय मिश्रा, नीना गुप्ता यांच्या ‘वध’चा ट्रेलर; सिनेप्रेमींना आठवलं ‘श्रद्धा हत्याकांड

दिल्लीमधील नुकत्याच घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाने पूर्ण भारत देशाला हादरवून ठेवले आहे. यामध्ये श्रद्धाचा बॉयफ्रेंड आफताब  तिचा खून करुन शरीराचे 35 टुकडे करुन जंगलामध्ये फेकूण दिले. अशातच संजय मिश्रा  आणि नीना गुप्ता यांचा आगामी चित्रपट ‘वध’ याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, ज्यामद्ये संजय मिश्रा यांनी देखिल श्रद्धाच्या खुनाप्रमानेच खून केल्याचे दाखवले आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून चांगल्य माणसाच्या अंगावर शाहारे येतील.

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील दोन प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकार संजय मिश्रा (Sanjay Mishra) आणि नीना गुप्ता (Neena Gupta) यांचा आगामी येणारा चित्रपट ‘वध’ याचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. संजय आणि नीना हे दिग्गज कलाकार पहिल्यांदा एका धमाकेदार कथेमध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. वध चित्रपटामध्ये एका सामान्य कुटुंबाची कथा दाखवली आहे, जे कठीण परिस्थितीचत्या घेऱ्यामध्ये फसतात आणि लोकांचा खून करण्यवर त्यांना भाग पडतो.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने चांगल्या मानसाच्या अंगावर काटा येइल एवढा धमाकेदार दाखवला आहे. संजय मिश्रा यांना आजपर्यत अनेक भूमिका साकारताना पाहिले आहे. मात्र, पहिल्यांदा त्यांनी अशी जबरदस्त भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये संजय आणि नीना यांच्या भूमिकांमध्ये दोन चेहरे दाखवले आहेत, एक जो खूप शांत भोळा व्यक्ती दाखवला आहे तर दुसरीकडे त्याचा डार्क भयानक चेहरा दाखवला आहे.

‘वध’ चित्रपटाची माहिती सांगत असाताना संजय मिश्रा यांनी सांगितले की, “एक अभिनेता असल्याच्या नात्याने मी कधीच अशाप्रकारच्या भूमिकेबद्दल कल्पना केली नव्हती, आणि तेही नीनाजी सोबत. मी या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे की, प्रेक्षक काय प्रतिक्रिया देतील.” यानंतर अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सांगितले की,” ‘वध’ एक खूप चांगली आणि थ्रिलर कथा आहे आणि मी या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान खूप चांगला वेळही घातला. ही कथा ज्याप्रकारे दाखवली आहे, त्याच्यापेक्षाही खूप काही जास्त आहे. प्रेक्षक ट्रेलर सोबतच चित्रपट पाहातानाही आनंद लुटतील.”

‘वध’ चित्रपटाचे कथाकथन आणि दिग्दर्शन राजीव बरनवाल (Rajeev Barnwal) आणि जसपाल सिंग सिंधू (Jaspal Singh Sandhu) द्वारे केले आहे. हा चित्रपट लवकरच म्हणजेच (दि, 9 डिसेंबर) रोजी चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित करण्यता येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिशा सालियनच्या मृत्यूबाबत मोठी बातमी, सीबीआयने सांगितले दिशाच्या मृत्यूचे कारण, वाचा…
‘सुशांत राजपूत एक प्रतिभावंतर कलाकार…’,म्हणत, शरद केळकरने व्यक्त केल्या भावना

हे देखील वाचा