लय भारी! दियासोबत लग्नबंधनात अडकल्यानंतर वैभवला पहिल्या पत्नीकडून मिळाल्या भन्नाट शुभेच्छा!


सध्या बॉलिवूड, टॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार नव्हे तर अनेक नावाजलेले खेळाडू देखील गुपचूप लग्न करून मोकळे होत आहेत. प्रत्येकाचे स्वप्न असते की त्याने आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करावे. काहींच्या या इच्छा पूर्ण होतात, तर काहींच्या अपुऱ्या राहतात. सेलिब्रिटी लव्ह अफेअर पासून ते लग्नापर्यंत अनेक विषयांवर सोशल मीडियावर सर्रास चर्चा होत असताना दिसतात. बॉलिवूड देखील यात काही मागे नाही काही. काही दिवसांपूर्वीच वरून धवन हा देखील लग्न करून मोकळा झाला आणि त्याचा लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर काही क्षणातच वायरल झाले होते. असे अनेक सुप्रसिद्ध चेहरे आहेत, जे अशाच प्रकारे लग्नाच्या बेडीत अडकले असल्याचे दिसून आले.

अभिनेत्री दिया मिर्झा आणि व्यावसायिक वैभव रेखी यांच्याबद्दल सुद्धा अनेक चर्चा रंगत आल्या होत्या. हे दोघे लॉकडाऊन दरम्यान लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. परंतु या दोघांनी १५ फेब्रुवारी रोजी आपली हिंदू रितीरिवाजानुसार लगीनगाठ बांधली. दिया मिर्झा हिचे हे दुसरे लग्न असून वैभव रेखी याचे सुद्धा दुसरेच लग्न आहे. त्याआधी योगा प्रशिक्षक सुनैना हिच्यासोबत त्याने लग्न केलं होतं आणि या दोघांना एक मुलगी सुद्धा आहे. आपल्या लग्नाबद्दल दिया ही बरीच चर्चेत आहे.

वैभवची पत्नी सुनैना रेखी हिने या दोघांच्या लग्नासाठी भन्नाट शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने या दोघांना शुभेच्छा दिल्या असून आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर त्या दोघांसाठी भली मोठी पोस्ट लिहिली आहे. ज्यात तिने या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

सुनैना हिने आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की, “हो माझ्या पतीने दियासोबत विवाह केला आहे. त्यासाठी मला बरेच मेसेज येत आहेत ज्यात लोक मला विचारत आहेत की, ‘तू आणि समायरा ठीक आहेस का?’ सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे आभार मानू इच्छिते की, तुम्ही मला आपलं समजलं आणि माझ्यासाठी काळजी व्यक्त केली. या विशेष प्रसंगी आपली मुलगी या समारंभात भाग घेऊ शकली ज्यामुळे मी खूप आनंदी आहे. आम्ही सर्व ठीक आहोत. मी माझ्या मुलीचे काही व्हिडिओ पाहिले ज्यात ती आनंदी आहे फुलांचा वर्षाव करत आहे.”

पुढे ती म्हणते की, “मुंबईत माझे कुटुंब नाही. परंतु ही चांगली गोष्ट आहे की, मुंबईत माझे कुटुंब वाढले आहे. कुटुंबातील व्यक्तींमध्ये वाढ होणे हे नेहमी चांगले असते. समायराला आपल्या माता-पित्याचे प्रेम मिळाले नाही आता या लग्नात तिला तो अनुभवता येईल ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.”

सुनैनाच्या या पोस्टवर सोशल मीडियावर तिला दमदार प्रतिक्रिया येत असून ही पोस्ट खूपच वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान दिया मिर्झाने असे काम केले आहे, ज्याने तिचे चाहते तिच्यावर भलतेच खुश होताना दिसत आहे कारण आपल्या लग्नाच्या सर्व विधी तिने एक महिला पंडिताकडून करून घेतल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘प्रेग्नंट वाटतीये!’ लग्नांनंतर प्रथमच समोर आलेल्या दियाला पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया; पाहा व्हायरल व्हिडिओ

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश


Leave A Reply

Your email address will not be published.