‘दिग्दर्शकाने कट म्हटले, तरीही दोघे एकमेकांना करत होते किस’, ‘रामलीला’च्या सेटवरील क्रू मेंबरने सांगितला ‘दीपवीर’चा ‘तो’ किस्सा


दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ही हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध जोडींपैकी एक जोडी आहे. या दोघांचाही असंख्य मोठा चाहतावर्ग आहे. परफेक्ट कपल म्हणून या दोघांकडे पाहिले जाते. सर्वांनाच या दोघांबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा असते. हे दोघे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. २०१८ साली त्यांनी इटलीमध्ये लग्न केले होते. लग्नाआधी हे दोघे जवळपास ६ वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. रामलीला सिनेमाच्या वेळी हे दोघेही जास्त जवळ आले. सुरुवातीचे काही महिने कोणालाही थांगपत्ता लागू न देता त्यांनी त्यांचे नाते सुरू ठेवले. सध्या व्हॅलेंटाईन आठवडा सुरु आहे, त्यानिमित्ताने आपण रामलीला सिनेमा त्यांच्यासाठी खास का आहे, हे जाणून घेऊया.

एका मुलाखतीदरम्यान रामलीला सिनेमाच्या एका क्रू मेंबरने सांगितले की, “२०१२ साली संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला-रामलीला’ या चित्रपटातील ‘अंग लगा दे’ हे गाणे आम्ही शूट करत होतो. गाण्याच्या शेवटी या दोघांमधला एक किसिंग सीन होता. या सीनचे शूटिंग चालू होते. त्यारात्री सेटवर ५० क्रू मेंबर हजर होते. या सीनचे शूट झाले आणि दिग्दर्शकाने कट म्हटले, तरीही हे दोघ एकमेकांना किस करतच होते. यानंतर आमच्या सर्वांसाठी कन्फर्म झाले की, हे दोघ प्रेमात आहेत.”

तो क्रू मेंबर पुढे म्हणाला, “त्यानंतर ते जेव्हा सेटवर यायचे, तेव्हा एकमेकांना ‘बेबी- बेबी’ म्हणूनच हाक मारायचे, सोबत जेवायचे, शूट नसेल तेव्हा व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून तासनतास गप्पा मारायचे. आम्हाला सगळ्यांना असे वाटायचे की, शूटिंग संपले की यांचे नाते देखील संपेल. मात्र, तसे झाले नाही, बाजीराव मस्तानी सिनेमात दीपिका रणवीर पुन्हा एकत्र आले, तेव्हा सर्वाना समजले की हे नाते नक्कीच शेवटपर्यंत टिकेल. आम्ही जेव्हा जेव्हा एकत्र जेवायला बसायचो, तेव्हा ते फक्त एकमेकांना बघत असायचे. दीपिका आसपास असताना रणवीर फक्त दीपिकाला पाहायचा.”

“बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या वेळी रणवीर त्याचे पॅकअप झाले, तरी दीपिकासाठी तो थांबायचा. त्यासाठी स्वतःच्या करिअरपेक्षा दीपिका आणि तिचे करियर जास्त महत्त्वाचे होते. त्यानेच दीपिकाला हॉलिवूडमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या लव्हस्टोरीचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत,” असेही दीपिका आणि रणवीरच्या नात्याबद्दल बोलताना क्रू मेंबर म्हणाला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-नोरा फतेहीच्या ‘या’ गाण्याने लावली इंटरनेटवर आग; एकाच आठवड्यात पार केला ६ कोटी व्ह्यूजचा टप्पा, पाहा व्हिडिओ
-गावाकडच्या पोरानं आपल्या डान्सनं ‘धकधक गर्ल’ला लावले वेड; मग माधुरीनेही केली मोठी घोषणा
-बिग बींना जया बच्चन यांच्यासोबत जायचे होते लंडनला; वडील हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर म्हणाले होते, ‘आधी…’
-ए भावड्या जरा इकडं बघ! टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यात झळकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओला मिळाले ९० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.