Thursday, July 18, 2024

पंधरा वर्षे ड्रायव्हर राहिलेल्या ‘दोस्ताचे’ निधन, अभिनेता वरुणने घेतला कौतुकास्पद निर्णय

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या (varun dhavan) ड्राइव्हरचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, वरुण मंगळवारी (१८ जानेवारी) नेहमीप्रमाणे बांद्राच्या मेहबूब स्टुडिओमध्ये शूटिंगसाठी आपल्या ड्राइव्हर मनोज साहूबरोबर गेला. नेहमीप्रमाणे मनोजने वरुणला शूटिंगच्या लोकेशनपर्यंत पोहचवले. परंतु त्यानंतर काय घडेल, काय होईल याचा कोणालाच अंदाज नव्हता. कोणाला माहित होतं की, वरुण आणि मनोज शेवटचे भेटत आहेत. मनोजने वरुणला शूटसाठी सोडलं.

मंगळवारी वरुण मेहबूबस्टुडिओमध्ये एका ऍडफिल्मच शूट करत होता. त्यासाठी सकाळी मनोज वरुणला घेऊन स्टुडिओमध्ये आला. शूटिंग संपण्याची वाट बघणाऱ्या मनोजला अचानक हार्ट अटॅक आला. त्याला जवळच्याच लिलावती रुग्णालयात ऍडमिट केल गेलं. परंतु तिथेच त्याने श्वास सोडला.

वरुणच्या जवळच्या टीममधल्या एका व्यक्तीनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार “सकाळी ६ वाजता मनोजला हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्याला लगेचच लीलावती रुग्ण्यालयात ऍडमिट केल गेलं. परंतु त्याला हॉस्पिटलला दुसरा हार्ट अटॅक आला आणि त्याचं निधन झालं.”

लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत असताना वरुण धवन त्याच्यासोबत होता. सतत तो मनोजची तब्बेत विचारत होता. यावरून त्याची मनोजबद्दल असलेली आपुलकी आपल्याला दिसून येते.

खरंतर मनोज साहू हा वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन यांचा ड्राइव्हर होता. त्यानंतर तो वरुण धवन अभिनेता झाल्यानंतर नेहमी त्यालाला शूटिंगला सोडायला आणायला येत असे. मनोज साहू गेली २५ वर्ष धवन परिवारासाठी ड्राइव्हर म्हणून काम करत होता. त्याने प्रामाणिकपणे आपल काम केलं म्हणून इतकी वर्ष तो त्या कुटुंबाचा भाग बनून राहिला. मनोज साहूचे छोटंसं कुटुंब आहे. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि दोन मुलं आहेत. वरुण आणि डेव्हिड धवन आणि परिवाराला मनोजच निधन झाल्यावर फार दुःख झालं.

हेही वाचा :

हे देखील वाचा